नागराज मंजुळे यांचा नाळ २ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. बहीण भावाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नाळ २ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कलाकार मंडळी ठिक ठिकाणी इंटरव्ह्यू देत आहेत अशाच एका इंटरव्ह्यू मध्ये नागराज मंजूळे यांनी त्यांच्या पत्नीबद्दल प्रथमच एक खुलासा केलेला पाहायला मिळाला. नागराज मंजुळे यांचे बालपण शिक्षण याबद्दल अनेकदा बोलले गेले पण त्यांनी पत्नीबद्दल कधी कुठे काहीच सांगितले नव्हते. हाच मुद्दा त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. नागराज मंजुळे पत्नी गार्गी कुलकर्णीला कुठे भेटले? त्यांच्यातील बॉंडिंग नेमकं कसं आहे याबद्दल ते सांगतात की, “मी आणि गार्गी नगरला भेटलो. आम्ही दोघेही तिथे एकत्र शिकायला होतो.
गार्गीला वाचनाची आवड आहे ती कविता लिहिते. मी पटकथा लिहितो त्यात मी ती कथा जवळच्या दोन तीन माणसांना ऐकवतो. त्यांच्या होकार नकारत मला चांगलं वाईट काय ते समजतं . किंवा त्यावर विचार करायला हवा याची जाणीव होते. मी ज्यावेळेस फँड्री लिहिलं त्यावेळी गार्गीच होती जिला मी त्याची पटकथा ऐकवली होती. फँड्री च नाही तर माझ्या इतरही चित्रपटाच्या पटकथा मी तिला ऐकवल्या आहेत. त्यात ती योग्य ते बदल करत असते. डोळे झाकून विश्वास ठेवावा असं तिचं काम असतं. गार्गीला साहित्येची कलेची जाण आहे. तिच्या कविता सुद्धा पुस्तकात छापून आलेल्या आहेत. ती क्रिएटिव्ह गोष्टी सांभाळते, निर्माती म्हणूनही तिने माझ्यासोबत काम केलेले आहे. माझा ती आरसाच आहे असे म्हणायला हरकत नाही”. असे नागराज मंजुळे गार्गी बद्दल भरभरून बोलताना दिसतात.
गार्गी कुलकर्णी ही मूळची उरण इस्लामपूरची. आदर्श बालक मंदिर ही तिची शाळा. पुढील शिक्षणासाठी ती अहमदनगर येथे गेली होती. तिथेच नागराज मंजुळे सोबत तिची ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. गार्गी कधीच पडद्यासमोर आलेली नाही मात्र पडद्यामागे राहूनही ती नागराज मंजुळे यांना खंबीर पाठिंबा देत असते. सैराट, फँड्री, घर बंदूक बिरयानी, नाळ २ चित्रपटाच्या यशात गार्गीचाही मोठा वाटा आहे. गार्गी बद्दल बोलताना नागराज मंजुळे अगदी बिनधास्तपणे बोलताना दिसते. पत्नीचे कौतुक करताना त्यांना तिचा अभिमान वाटत होता. त्यांच्यातील हे बॉंडिंग प्रथमच मीडियासमोर आले आहे.