news

प्रसाद अमृताच्या लग्नाचं अनोख्या अंदाजात आमंत्रण… लग्ना अगोदरच्या विधींना सुरुवात

मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. मराठी बिग बॉसच्या घरात सूर जुळलेली लाडकी जोडी म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्याही लग्नाची लगबग गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचे शेवटचे केळवण प्रसादचा काकांच्या घरी पार पडले होते. त्यानंतर लगेचच आज या दोघांचे ग्रहमख पूजन पार पडले. ग्रहमख पूजनावेळी अमृताने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. अमृताच्या मावशीने तिला ही साडी गिफ्ट दिलेली होती. ग्रहमख पूजनाचे काही खास क्षण अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

prasad and amruta wedding invitation card
prasad and amruta wedding invitation card

अमृता आणि प्रसाद दोघेही शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात या दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने एंगेजमेंट केली होती, त्यावेळी फक्त घरच्याच मंडळींची तिथे उपस्थिती होती. त्यामुळे आता त्यांचे होणारे लग्न मोठ्या थाटात पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या डेस्टिनेशन वेडिंगचा थाट नेमका कसा असणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. उद्या अमृता आणि प्रसादच्या लग्नाची मेहेंदी साजरी होणार आहे तर शुक्रवारी हळदीचा सोहळा पार पडणार आहे. रात्री संगीत सोहळा आणि त्यानंतर लग्नसोहळा असे त्यांचे लग्नाचे नियोजन असणार आहे. प्रसाद आणि अमृता कधी लग्न करतील की नाही यावर प्रेक्षकांनाही विश्वास नव्हता. कारण बिग बॉसच्या घरात जुळलेले सूर बाहेर पडल्यानंतर वेगळे होतात याची प्रचिती याअगोदर प्रेक्षकांना आलेली आहे. प्रसाद आणि अमृता बिग बॉसच्या घरात होते तेव्हाही हे दोघे कधी फारसे एकत्र दिसले नव्हते पण जेव्हा अपूर्वा नेमळेकर हिने प्रसादला एका खास अंदाजात अमृताला प्रपोज करण्यास सांगितले त्यानंतर दोघांनाही एकमेकांबद्दल आपुलकी वाटू लागली.

amruta deshmukh and prasad jawade pre wedding photos
amruta deshmukh and prasad jawade pre wedding photos

अगदी शेवटच्या क्षणी या दोघांचे सूर जुळलेत याची जाणीव होते न होते तोच अमृताला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. पण त्यानंतर हे दोघे एकमेकांना भेटू लागले. कुठेही कोणालाही खबर लागू न देता या दोघांचे एकत्रीत फिरणे होऊ लागले. तेंव्हास त्यांच्या नात्याबद्दल कुजबुज सुरू झाली. पण अचानक जुलै महिन्यात दोघांच्या साखरपुड्याच्या बातमीने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. नुकतेच प्रसाद आणि अमृताने त्यांच्या लग्नाचे चाहत्यांना हटके अंदाजात आमंत्रण दिले आहे. एका ऍनिमेशन व्हिडिओत प्रसाद आणि अमृता बिग बॉसच्या घरातली पाटी घेऊन येतात. तेव्हा अमृताने लिहिलेली कविता त्या व्हिडिओत शेअर केली जाते. हेच लग्नाचे खास निमंत्रण असे म्हणत दोघांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यापाठोपाठ आज ग्रहमख पूजनाने त्यांच्या लग्नागोदरच्या विधींना सुरुवात झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी पार पडत असलेल्या अमृता आणि प्रसादच्या लग्नाचा थाट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button