news

मराठी सृष्टीतील हे ४ स्टार किड्स वेधतायेत चाहत्यांचे लक्ष…फोटो होत आहेत व्हायरल

बॉलिवूड सृष्टीत स्टार किड्सना नेहमी लोकप्रियता मिळत असते. सोशल मीडियावर तर त्यांची नेहमीच क्रेझ असते. अगदी करिनाची मुलं, आलिया भटची मुलगी, विराट अनुष्काची मुलगी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलेले आहेत. मराठी सृष्टीत हे प्रसिद्धीचे प्रमाण कमी असले तरी मराठी कलाकारांच्या मुलांबाबत जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आज १४ नोव्हेंबर बालदिन या खास दिवसाचे औचित्य साधून मराठी सृष्टीतील काही लक्षवेधी स्टार किड्सबद्दल जाणून घेऊयात. मराठी सृष्टीतील हे स्टार किड्स भविष्यात आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झाले नाही तरच नवल म्हणावे लागेल . कारण हे स्टार किड्स आतापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात देखील यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे चार स्टार किड्स आहेत तरी कोण ते जाणून घेऊयात.

smita tambe with husband and daughter
smita tambe with husband and daughter

स्मिता तांबे ही मराठी सृष्टीतील एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात स्मिताचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण झाले. यातूनच तिला विविध धाटणीच्या चित्रपटातून नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. बॉलिवूड सृष्टीतही स्मिताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. वीरेंद्र द्विवेदी या कलाकारासोबत तिने लग्नगाठ बांधली. २०२१ मध्ये स्मिताला कन्यारत्न प्राप्ती झाली. ‘वैदिका’ हे स्मिताच्या लाडक्या लेकीचं नाव. वैदिका अवघ्या दोन वर्षांची आहे पण आतापासूनच ती तिच्या क्युटनेसने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्मिता आणि वीरेंद्र दोघेही नाळ २ चित्रपटाच्या प्रीमियरला हजर होते. यावेळी स्मिता सोबत तिची लेक वैदिका देखील हजर होती. वैदिकाला पाहून अनेकांनी तिच्या क्यूटनेसच मोठं कौतुक केलं. तर मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी देखील आतापासूनच तिचे फॅन झालेले आहेत. फुलवा खामकर, क्रांती रेडकर, सोनाली खरे, गौरी कुलकर्णी यांनाही वैदिकाचा निरागसपणा खूपच भावलेला आहे.

mrunal dusanis with husband and daughter
mrunal dusanis with husband and daughter

दुसरी स्टार कीड आहे अभिनेत्री मृणाल दुसानिस हिची मुलगी ‘नूरवी’. नूरवी सध्या दीड वर्षांची आहे. पण या चिमुरड्या नूरवीने अबोल निरजला बोलतं केलेलं आहे. बाप लेकीचा क्युट बॉण्ड मृणाल तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच शेअर करत असते. परदेशात स्थायिक झालेल्या मृणालचा वेळ आता नूरवीच्या येण्याने व्यस्त झाला आहे. नुकतेच मृणालने नूरवि सोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी नूरवीने खनाचे परकर पोलकं घालून पारंपरिक पद्धतीने ही दिवाळी साजरी केली.

vijay andalkar and rupali zankar daughter photos
vijay andalkar and rupali zankar daughter photos

मराठी सृष्टीतील तिसरी स्टार कीड आहे विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांची लेक ‘मायरा’. जानेवारी महिन्यात विजय आंदळकर आणि रूपालिला कन्यारत्न प्राप्ती झाली. अवघ्या ११ महिन्यांची मायरा आतापासूनच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. स्टार प्रवाहावर झालेल्या एका सोहळ्यात मायराने हजेरी लावली होती. त्यावेळी या क्युट मायराने सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेतले होते. अभिनेता शशांक केतकरला तीचा एवढा लळा लागला की आईनेही बोलावल्यावर ती तिच्याजवळ गेली नव्हती.

rushikesh shelar daughter photos
rushikesh shelar daughter photos

चौथी स्टार कीड आहे स्नेहा काटे आणि ऋषीकेश शेलारची मुलगी ‘रुही’. जानेवारी महिन्यातच ऋषीकेश आणि स्नेहाला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. ऋषीकेश सध्या अधिपतीच्या भूमिकेमुळे चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. पण मालिकेतून जसा वेळ मिळेल तसा तो लवकरात लवकर आपले घर गाठतो. रुहीला भेटण्यासाठीची त्याची ही ओढ आता त्याच्या सहकलाकारांना देखील परिचयाची झाली आहे. बाप लेकीचं हे बॉंडिंग कित्येकदा ऋषीकेश त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button