news

एकाच चित्रपटामुळे मिळाली प्रसिद्धी पण गंभीर आजाराशी झुंज देत …मुलगीही आहे कर्तृत्ववान

आज १८ फेब्रुवारी, माझं घर माझा संसार चित्रपटाची नायिका मुग्धा चिटणीस यांचा जन्मदिवस. एका चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कलाकारांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेला “माझं घर माझा संसार” हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झाला होता. अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘दृष्ट लागण्या जोगे सारे…’ ‘हसणार कधी…’ अशी चित्रपटाची गाणी आजही तितक्याच आवडीने पाहिली, ऐकली जातात. संसार म्हटलं की सासू सुनेचे वाद होणार हे त्याकाळचं ठरलेलं गणित. रत्नाकर मतकरी यांच्या ‘माझं काय चुकलं’ या नाटकावर चित्रपटाचे कथानक आधारित होते. मुग्धा चिटणीस यांनी अभिनित केलेला हा एकमेव मराठी चित्रपट ठरला. कारण या नायिकेने १० एप्रिल १९९६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

mugdha chitnis father ashok chitnis and mother shubha
mugdha chitnis father ashok chitnis and mother shubha

मुग्धा चिटणीस या डॉ शुभा चिटणीस आणि अशोक चिटणीस यांच्या कन्या. दोघेही शिक्षक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मुग्धाला लहान असल्यापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. अभिनय क्षेत्रात त्यांचे पाऊल ओघानेच पडले असे म्हणायला हरकत नाही.कारण वाचनाची आवड आणणाऱ्या मिग्धा यांना कथाकथन शैलीत रस असायचा. या शैलीत त्यांनी जवळपास ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्या कार्यक्रम सादर करत असत. मुग्धा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर काही वर्षातच त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते . तेव्हा त्यावर उपचार म्हणून त्यांना कडू औषधं दिली जायची. ही औषधं घेत असताना त्या पाडगावकर , विं दा करंदीकर यांच्या कविता म्हणत असे. वाचनाची प्रचंड आवड, कम्प्युटरसारखी त्यांची मेमरी असल्याने त्या कविता त्यांच्या मुखोद्गत असायच्या. पण दुर्दैवाने या गंभीर आजाराशी तोंड देत असताना त्यांना एक दिवस मृत्यूने गाठले. तेव्हा त्यांची मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती.

actress mugdha chitnis
actress mugdha chitnis

त्यांच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आज्जी आजोबा अशोक चिटणीस आणि डॉ शुभा चिटणीससोबत राहू लागली. उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिले. शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत नेले. ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं आहे. अमेरिकन सरकारने ‘लॉ अँड सायन्स’ विभागात तिला प्रशिक्षण देऊ केले. २०१५ साली जगातल्या बुध्दीमान व्यक्तींना देण्यात येणाऱ्या फुलब्राइट स्कॉलरशीपची ती मानकरी ठरली होती. जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी देखील तिने मिळवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button