news

हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे आशा काळे ह्यांची भाची…बहीण देखील होती प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्याच्या आईची साकारली होती भूमिका

आई वडील किंवा नातेवाईक यांच्यापैकी कोणाचे तरी पाठबळ असले की कला सृष्टीत येण्याचा मार्ग मोकळा होतो असे म्हटले जाते. पण याच जोडीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे तेवढेच गरजेचे आहे. नाहीतर काही कलाकारांचे आईवडील मोठे प्रस्थ असतानाही पर्यायी मार्गाची त्यांना निवड करावी लागते. आज अशाच एका गुणी अभिनेत्रीची गोष्ट जाणून घेऊयात. नुकताच झी टॉकीजवर ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा प्रसारित करण्यात आला होता. या सोहळ्याचे सादरीकरण काही दिवसांपूर्वी पार पडले होते. तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचे मराठी चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल “विशेष योगदान सन्मान ” देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्याच सोबत काम करणाऱ्या प्रिया बेर्डे, अल्का कुबल, नीना कुळकर्णी, सुकन्या कुलकर्णी यांच्याकडून एक सन्मानचिन्ह आणि साडी देऊन आशा काळे यांचा सत्कार करण्यात आला.

aasha kale sister lata arun karnataki
aasha kale sister lata arun karnataki

‘या चारही अभिनेत्रींबरोबर मी काम केलं आहे. आता मराठी सृष्टीत त्या सर्वांनी मोठं नाव कमावलं आहे. माझ्यासोबत यांनी सून, मुलीच्या भूमिका साकारल्या आहेत त्या सुनांकडून मुलींकडून माझा सन्मान होतोय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.’ असे म्हणत आशा काळे यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. तेव्हा प्रिया बेर्डे यांनीही त्यांच्यासोबत काम केलं असल्याची एक आठवण इथे सांगितली. आणि ‘आशा काळे ही माझी मावशी आहे’ ,असेही त्यांनी अधोरेखित केले. हे सांगताना ‘ प्रिया बेर्डे म्हणतात की, ‘मी लहान होते तेव्हा आशा मावशीसोबत एका चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली होती. मी तिला आशा मावशीच म्हणते. ती माझ्या आईची बहीण आहे.

zee gaurav puraskar to aasha kale
zee gaurav puraskar to aasha kale

लता काळे माझी आई आणि आशा काळे या दोघींच्या अभिनयाचा प्रभाव माझ्या बालमनावर पडला होता’. असे म्हणत प्रिया बेर्डे यांनी आशा काळे यांचे कौतुक केले. प्रिया बेर्डे यांच्या आई लता अरुण कर्नाटकी. लक्ष्याच्या एक गाडी बाकी अनाडी ह्या चित्रपटात प्रियाच्या आईने लक्ष्याच्या आईची भूमिका साकारली होती. ह्या चित्रपटात प्रियाने देखील प्रमुख भूमिका पार पडली होती. पूर्वाश्रमीच्या त्या लता काळे म्हणून ओळखल्या जात. प्रिया बेर्डे यांचे आजोबा वासुदेव कर्नाटकी, वडील अरुण कर्नाटकी, चुलत आत्या बेबी नंदा, मामी माया जाधव, मामा शहाजी काळे, व्ही शांताराम, भालजी पेंढारकर अशा इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे नातेसंबंध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button