डिसेंबर महिना मराठी मालिका सृष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण या महिन्यात एक दोन नव्हे तर चार प्रसिद्ध कलाकार खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. हे कलाकार कोण आहेत ते जाणून घेऊयात. नुकतेच काही कलाकारांनी केळवणाला सुरुवात केलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या केळवणाच्या थाटाने तिच्या चाहत्यांमध्येही लग्नाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सध्या रेश्मा शिंदे स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकीची मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेची ती नायिका आहे. पण लवकरच रेश्मा विवाहबद्ध होत आहे त्यामुळे या मालिकेतून ती मोठा ब्रेक घेताना दिसणार आहे.
रेश्मा शिंदे हिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव ‘पवन’ आहे. अभिजित चौगुले सोबत तिचं पहिलं लग्न झालं होतं मात्र २०१७ मध्ये तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. त्यामुळे तिच्या या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रेश्मा शिंदेच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार हिच्याही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे. अभिनेता अंबर गणपुले सोबत ती हा प्रेमविवाह करत आहे.
नुकतेच या दोघांनी मित्र मैत्रिणीसोबत बॅचलर पार्टी साजरी केली होती. अंबर गणपुले हा कलर्स मराठीच्या ‘दुर्गा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. पण काहिच दिवसांपूर्वी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसली. त्यामुळे सध्या तरी अंबर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळत नाहीये. तर अभिनेता शाल्व किंजवडेकर हा देखील डिसेंबर महिन्यात विवाहबद्ध होताना दिसणार आहे.
शाल्वने मराठी सृष्टीत अवघ्या दोनच मालिका केल्या आहेत पण तरीही त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. सध्या झी मराठीच्या ‘शिवा’ या मालिकेत तो आशुची भूमिका गाजवत आहे. पण आता लग्नसराईमुळे त्याला या मालिकेतून ब्रेक घ्यावा लागणार आहे. शाल्व किंजवडेकर हा फॅशन डिझायनर श्रेया दफळापूरकर सोबत लग्न करत आहे. नुकताच त्यांच्या व्याही भोजनाचा सोहळा पार पडला होता. त्यामुळे येत्या काही दिवसातच त्याच्या लग्नसराईला सुरुवात होणार आहे. मालिकेतून हे सर्व कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यामुळे स्वतःच्या लग्नासाठी त्यांना मालिकेतून ब्रेक घ्यावा लागत आहे. अर्थात काही शूटिंग ते अगोदर पूर्ण करूनच ही सुट्टी घेतील पण तरीही मालिकेत कुठेतरी यांची कमी नक्कीच जानवताना दिसेल.