सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहणे सहज शक्य झाले आहे. या माध्यमातून कलाकार मंडळी त्यांच्या सुख दुखाबद्दल अनेक खुलासे करताना पाहायला मिळतात. कोणी काम नाही म्हणून मदत मागतात तर कोणी आपल्या आजारपणाबद्दल माहिती देतात. जुई गडकरी असो किंवा भाग्यश्री मोटे, भाग्यश्री दळवी यांनी त्यांच्या असाध्य आजारांवर मात केली आहे. तर असाच काहीसा असाध्य आजार मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका गायकवाड हिला झाला आहे. कृतिकाने तिचे पोट फुगलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘मी प्रेग्नंट नाहीये ‘…असे म्हणत तिने या आजाराबद्दल माहिती दिली आहे. कृतिका ही उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने काही डान्सच्या रिऍलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवली होती. गैरी, टाईमपास ३ चित्रपटात तिने आयटम सॉंग केले होते. विठ्ठला शपथ, धुमस, बंदीशाळा अशा चित्रपटातून तिने अभिनय देखील केला आहे. पण गेल्या काही दिवसात कृतिकाने एका गंभीर आजाराशी तोंड दिले आहे.
काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता तेव्हा ती आजारी असल्याचे कळताच चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. पण कृतिकाने आज तिच्या या आजारपणाबद्दल मोठा खुलासा केलेला पाहायला मिळतो आहे. कृतिका गेल्या काही दिवसांपासून फायब्रॉइड्स या आजाराचा सामना करत आहे. या आजारामुळे कृतिकाचे पोट फुगले आहे. यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा भास होतो. पण या आजरपणाबद्दल तिने तिच्या चाहत्यांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. असं काही घडल्यास तुमच्या डॉक्टरांकडे जा असेही तिने म्हटले आहे.
कृतिका तिच्या या आजारपणाबद्दल म्हणते की, “नाही मी गरोदर नाही, हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहेत जे वर्षानुवर्षे विकसित झाले आहे! फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठ. या गाठी मसल्स आणि कनेक्टीव्ह टिश्यूज किंवा स्मूथ टिश्यू पासून (पेशी) बनलेल्या असतात. फायब्रॉइड्सला लायोमायोमाज किंवा युटेरियन फायब्रॉईड असेही म्हणतात. फायब्रॉईड हे एका वाटण्यापेक्षा लहान किंवा टरबूजा एवढे मोठेही असू शकतात. एक किंवा एकापेक्षा जास्तही असू शकतात. मोठ्या फायब्रॉईड च्या मगे लहान फायब्रॉईड लपलेले असू शकतात. यामुळे सर्जरी नंतरही लहान फायब्रॉईड राहून जाण्याची शक्यता असते. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजाराबद्दल सविस्तर माहिती अशी की, फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठ. या गाठी मसल्स आणि कनेक्टीव्ह टिश्यूज पासून बनलेल्या असतात. फायब्रॉइडचा संबंध वंध्यत्वाशी जोडला गेला असला, तरी अद्याप त्याचे कारण ठरवणे कठीण आहे.
फायब्रॉईड ट्रीटमेंट घेतल्यानंतर गर्भधारणेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र बरेच आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला मातृत्व प्रदान होऊ शकते. फायब्रॉइड हे स्नायूंच्या ट्यूमर आहेत जे गर्भाशयाच्या भिंतीमध्ये वाढतात. फायब्रॉइड्स जवळजवळ नेहमीच सौम्य असतात (कर्करोग नसतात). फायब्रॉइड असलेल्या सर्व महिलांमध्ये लक्षणे नसतात. ज्या स्त्रियांना लक्षणे दिसतात त्यांना सहसा फायब्रॉइड्ससह जगणे कठीण वाटते. काहींना वेदना होतात आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. यातील काही वाढ डोळ्यांनी पाहण्यास खूपच लहान असते. द्राक्षाच्या किंवा त्याहून मोठ्या आकारात त्या गाठी वाढू शकतात. एक फायब्रॉइड जो खूप मोठा होतो तो गर्भाशयाच्या आतील आणि बाहेरील भाग विकृत करू शकतो. काही फायब्रॉइड्स श्रोणि किंवा पोटाचे क्षेत्र भरण्यासाठी पुरेसे मोठे होतात. ते एखाद्या व्यक्तीला गर्भवती प्रमाणे दाखवतात. कृतिकाला हा आजार झाल्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा भास होतो. पण वेळीच सावध झाल्याने कृतिकाचे या आजरावर उपचार सुरू आहेत. या आजारातून ती सुखरूप बाहेर पडावी म्हणून चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. शिवाय अशा आजाराबद्दल जागरूक केल्यामुळे तिचे धन्यवाद देखील मानले जात आहेत. कृतिका या आजारातून लवकरात लवकर बरी होवो हीच सदिच्छा.