
मराठी सृष्टीत गेले काही दिवस कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नन्सीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्री अमृता पवार ही लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून काहीशी दूर होती. पण आता ती प्रेग्नंट असल्याचे तिने जाहीर केले आहे. एक व्हिडिओ शेअर करत अमृताने “Baby on the way”…म्हणत ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली.
त्यावर आता सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. अमृता पवार बद्दल सांगायचं तर तिने ललित २०५ मालिकेतून छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवली होती. झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत तिची हार्दिक जोशी सोबत जोडी जुळली. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून ती जिजाऊंची ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसली. अमृताने तिच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. पण तिला खरी ओळख मिळाली ती स्वराज्यजननी जिजामाता मालिकेमुळे.

जुलै २०२२ मध्ये अमृताने निल पाटील सोबत थाटात लग्न केलं. लग्नानंतर मात्र अमृता अभिनयापासून थोडीशी बाजूला झालेली दिसली. घर संसार आणि आणि पहिल्या अपत्याची चाहूल लागताच तिने या सृष्टीतून मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मातृत्वाची चाहूल लागलेल्या अमृताला तिच्या पहिल्या वहिल्या बाळाचे वेध लागले आहेत.