या कारणामुळे लाखात एक आमचा दादा अभिनेत्रीने मालिकेला ठोकला रामराम.. हि अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत

काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहच्या प्रेमाची गोष्ट मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने एक्झिट घेतली होती. तेजश्रीने मालिका सोडल्याने मालिकेचा टीआरपी चांगलाच घासलेला पाहायला मिळाला. आता याचीच पुनरावृत्ती लाखात एक आमचा दादा मालिकेतील मुख्य अभिनेत्रीमुळे पाहायला मिळणार आहे. लाखात एक आमचा दादा मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी हिने मालिकेतून काढता पाय घेतला आहे.
दिशा परदेशी हिच्याजागी आता “तुळजा”च्या भूमिकेत मृण्मयी गोंधळेकर झळकताना दिसणार आहे. मृण्मयी गोंधळेकर हिने याअगोदर स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत ‘राजमा’ची भूमिका साकारली होती. पण अनेकांना हा प्रश्न पडला कि मालिकेतील प्रमुख पत्राने मालिका का सोडली असावी? तर याच उत्तर तुळजा म्हणजेच अभिनेत्री दिशा परदेशी हिनेच दिल आहे.

दिशा परदेशी म्हणते “गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे मालिकेत काम करता येत नाही. आजारातून बाहेर पडण्याचा मी खूप प्रयत्न केला पण आता डॉक्टरांनीच आरामाची सक्ती केली आहे. इच्छा असूनही काम करता येत नाही. नाईलाजाने मालिका सोडावी लागतेय. मी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा सदैव भाग राहीन ह्या मालिकेने खूप काही दिलंय.”