मराठी सृष्टीत विनोदाचे सम्राट म्हणून ओळख मिळवलेले अशोक सराफ त्यांच्या एका व्हिडिओमुळे चांगलेच ट्रोल झालेले पाहायला मिळत आहेत. अशोक सराफ यांचा अभिनय क्षेत्रातला अनुभव खूप दांडगा आहे. मराठी सृष्टीतील अनेक नवख्या कलाकारांच्या कामचं ते नेहमी कौतुक करत असतात. त्यामुळे अनेकजण अशोक सराफ यांना गुरुस्थानी मानतात. मामांसारखा नट होणे नाही अशी प्रतिक्रिया आजही अनेकांकडून त्यांना मिळत असते. त्याचमुळे ते या इंडस्ट्रीत सर्वांचे लाडके मामा झाले आहेत. पण सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अशोक सराफ यांचे वागणे पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच भाऊ कदम यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली.
अशोक सराफ एका रूममध्ये निवांतपणे बसलेले होते. भाऊ कदम यांचा सहकारी हा व्हिडीओ बनवत होता. अशोक सराफ यांना पाहताच भाऊ कदम त्यांच्या पाया पडतात. आणि गप्पा मारू लागतात. भाऊ कदम आता कुठे राहतो? , त्याचं काम कसं चाललंय अशा त्यांच्या खाजगी गप्पा सुरु असतात. भाऊ कदम अतिशय नम्रपणे अशोक मामांसमोर उभं राहून बोलत असतात. त्यांचा हा सुसंवादाचा व्हिडीओ भाऊ कदम यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहून मामांना भाऊ कदमला साधं बसावं असं म्हणू वाटलं नाही का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अशोक सराफ तसेच गप्पा मारत असताना पाहून भाऊ कदम उभेच असतात. समोर बसायला जागा असूनही ते भाऊ कदम यांना बसायचे सुचवू शकत नाही असे म्हणत नेटकऱ्यांनी अशोक सराफ यांच्या अशा वागण्याचा समाचार घेतला आहे. यावरून अनेकजण अशोक सराफ यांना नावं ठेवताना दिसत आहेत मात्र त्याच बाजूला काहीजण त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशोक सराफ आणि भाऊ कदम यांचा सर्वसाधारण संवाद सुरू आहे. भाऊ कदम स्वतःच अशोक सराफ यांना भेटायला गेले होते. समोर असलेलं व्यक्तिमत्व हे खूप मोठं आहे आणि त्यांचा या इंडस्ट्रीत तेवढा आदरसुद्धा आहे. समोर एवढा दांडगा अनुभव असलेला व्यक्ती बसलेला असताना भाऊ कदम यांनीही उभं राहून त्यांचा आदर राखला आहे. ही एक सर्वसाधारण भेट होती त्याला लोकांनी वेगळे वळण देऊ नये असे मत जाणकार प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे. भाऊ कदम यांचा नम्रपणा त्यांच्याजागी योग्य आहे आणि मामांचं एवढं मोठं नाव असल्याने त्यांचे वागणेही त्यांच्याजागी योग्यच आहे. या वागण्यात वेगळं असं काहीच नाही म्हणत अशा निष्कारण ट्रोलिंगला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.