news

पुन्हा बिकीनीमुळे मराठी अभिनेत्री ट्रोल… समुद्र किनाऱ्यावरील फोटो होत आहेत व्हायरल

कौतुकाच्या जोडीलाच कलाकारांना वेळप्रसंगी चहात्यांच्या टीकेला देखील तोंड द्यावे लागत असते. एक मराठी अभिनेत्री म्हणून तिने साजशृंगार करून साडी नेसूनच आपली संस्कृती जपावी असा या टीकाकारांचा अट्टाहास असतो. पण अशा हट्टाला जर कोणी छेद देण्याचा प्रयत्न केला तर त्या अभिनेत्री टीकेच्या धणी ठरतात. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री मिताली मयेकर हिने घेतलेला पाहायला मिळतो. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी सृष्टीतील सेलिब्रीटी कपल सध्या परदेशात ट्रिपला गेलेलं आहे. दुबईत राहून त्यांना आता काही दिवस झालेले आहेत. या दिवसांत मिताली आणि सिध्दार्थने त्यांची दुबईची ट्रिप चांगलीच एन्जॉय केलेली पाहायला मिळाली.

actress mitali mayekar in bali
actress mitali mayekar in bali

नुकतेच हे दोघे बाली इंडोनेशियात ट्रिप एन्जॉय करत आहेत. मितालीने तिथल्या कांगुच्या बाली बीचवर बिकिनी घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी मात्र तिला पुन्हा एकदा मराठी संस्कृतीची आठवण करून दिली आहे. गेल्या वर्षी देखील मितालीने स्पेनमध्ये असताना बिकिनीवरचे फोटो शेअर केले होते. तेव्हाही तिला अशाच टिकेला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी मितालिने ‘मला आपली संस्कृतीबद्दल ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका’ असे म्हणत तिने ट्रोलर्सना खडेबोल सुनावले होते. पण आताही मितालीला बिकीनी फोटोशूटमुळे पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येत आहे. पण मितालीला ट्रोल करणाऱ्यांना तिच्या चाहत्यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तर सेलिब्रिटींनी तिच्या या फोटोंवर कौतुकाच्या कमेंट्स दिल्या आहेत.

mitali mayekar photos
mitali mayekar photos

सिद्धार्थ आणि मिताली आता बरेच दिवसापासून परदेशातली ही ट्रिप एन्जॉय करत आहेत. त्यामुळे तिथले जेवण जेवून कंटाळा आल्याने सिध्दार्थला भारतीय जेवणाची आठवण झालेली आहे. आदल्या दिवशीचा चिकन, मटणाचा किंवा शेव भाजीचा रस्सा , शिळ्या भाकरीचा कुस्करा, मिरची लसणाचा ठेचा आणि घट्ट झालेली शेवयाची खीर एवढं पुरेसं आहे म्हणत त्याने घरच्या जेवणाची आठवण काढली होती. काहीच दिवसांपूर्वी सिध्दार्थने मितालीचा वाळवंटात चालतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा मिताली चालता चालता खाली पडली होती. तेव्हा सिद्धार्थ लोटपोट होत ‘धुसमूसळी बायको’ असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button