सशक्त महिला कधीही हार मनात नाही चुकीच्या व्यक्तीसोबत असण्यापेक्षा… Ex नवऱ्याच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकांची पहिली प्रतिक्रिया

अभिनेत्री मानसी नाईक हिने काही महिन्यांपूर्वी परदीप खरेरा पासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला होता. त्यानंतर मानसी नाईक कला सृष्टीत रममाण झाली. एकीकडे या दुःखातून स्वतःला सावरत असतानाच मानसी नाईकचा घटस्फोटित नवरा पुन्हा एकदा बोहल्यावर चढताना दिसणार आहे. काल परदीप खरेरा याने सोशल मीडिया स्टार विशाखा पनवार हिच्यासोबत साखरपुडा केल्याची बातमी जाहीर केली. त्याच्या या साखरपुड्याच्या बातमीने अनेकांना मोठा धक्का बसला. या बातमीने निश्चितच मानसी नाईकला देखील धक्का बसला आहे पण स्वतःला सावरत ती या गोष्टीला हिमतीने सामोरी जाण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात परदीप खरेराने मानसी नाईकला अगोदरच धोका दिलेला होता.

केवळ पैशांसाठी त्याने लग्न केल्यामुळे मानसी नाईकने त्याला घटस्फोट दिला होता. परदीपच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर मानसी नाईकने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यात ती प्रथमच तिच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मानसी नाईक तिच्या या पोस्टमध्ये म्हणते की, “एखाद्या सशक्त व्यक्तीला अशा जगात अविवाहित राहण्यासाठी आवश्यक आहे ज्याला फक्त काहीतरी आहे असे म्हणण्यासाठी काहीही करून सेटल करण्याची सवय आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रहा… प्रार्थना, शांतता, सकारात्मकता, संयम बाळगा. कोणीतरी होईपर्यंत अविवाहित रहा अविवाहित राहण्यापेक्षा तुमच्या आयुष्याची प्रशंसा करा. तोपर्यंत, सेटल करू नका.

प्रेमाची आशा करा, प्रेमासाठी प्रार्थना करा, प्रेमाची अपेक्षा ठेवा, प्रेमाची स्वप्ने पहा… परंतु प्रेमाची वाट पाहत आपले जीवन थांबवू नका. चुकीच्या व्यक्तीसोबत असण्यापेक्षा अविवाहित राहणे नक्कीच चांगले आहे. या वर्षी मी हरले, जिंकले, अयशस्वी झाले, रडले, हसले, प्रेम केले, पण मी खचले नाही. सशक्त महिला कधीही हार मानत नाहीत. आम्हाला कदाचित कॉफीची आवश्यकता वाटू शकते, रडणे किंवा अंथरुणावर दिवभर लोळण्याची आवश्यकता असू शकते, पण आम्ही पुन्हा त्याच जोमाने पुढे येतो. माझ्या सर्व वेदना वाहून गेल्या आहेत त्याकडे मी कधीही मागे वळून पाहत नाही, ना कधी हार मानणार नाही… कधीही. चीयर्स टू बीइंग मी”…असे म्हणत मानसी नाईकने स्वतःला खंबीर करत दुःखातून सावरलं आहे.