पहिली गोष्ट ही प्रत्येकासाठीच खूप खास मानली जाते. सैराट चित्रपटामुळे लोकप्रियता मिळवलेली रिंकू राजगुरू हिने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. Tata Harrier ही तब्बल २२ ते २४ लाखांची गाडी खरेदी करून रिंकूने ही अनांदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आयुष्यातली पहिली वहिली गोष्ट ही कुणासाठीही खासच असते. रिंकूनेही तिच्या स्वतःच्या कमाईने ही पहिली वहिली गाडी खरेदी केलेली आहे. त्यामुळे रिंकुवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाच्या टाटा हॅरिअरसोबत रिंकूने काही खास फोटो शेअर केले आहे ते पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. रिंकू राजगुरू ही आता मराठी सृष्टीत चांगलीच स्थिरावलेली आहे.
सैराट या तिच्या पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवले होते. पण या चित्रपटानंतर रिंकुला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. अर्थात एक मुख्य नायिका म्हणून तिच्याकडे आठवा रंग प्रेमाचा, कागर, खिल्लार, छु मंतर, मेकअप, २०० हल्ला हो असे चित्रपट आले. पण तिचे हे चित्रपट कधी आले आणि कधी गेले हेही प्रेक्षकांना फारसे ठाऊक नाही. दरम्यान झिम्मा २ मध्ये तिला एक महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. निर्मिती सावंत यांच्या सुनेची भूमिका तिने साकारली होती.
या भूमिकेने रिंकुला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले. दरम्यान रिंकूने तिच्या या अभिनयाच्या कारकिर्दीत जवळपास १३ ते १४ चित्रपट केले. पण सैराट चित्रपट तिच्यासाठी माईलस्टोन ठरला. या यशाच्या प्रवासात स्वतःची गाडी खरेदी करण्याचा मोह तिला आवरला नाही. आणि म्हणूनच भारतीय बनावटीची टाटा हॅरीअर गाडी खरेदी करून तिने तिच्या आनंदात भर घातली आहे.