news

मानसी नाईकचा घटस्फोटित नवरा दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात….त्याच्यासाठी गर्लफ्रेंडने अख्ख थिएटर केलं बुक

गेल्या वर्षी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या घटस्फोटाची चर्चा पाहायला मिळाली होती. त्या वर्षात घटस्फोटाच्या प्रक्रियेला ती सामोरी जात होती. काही दिवसांपूर्वीच तिला परदीप खरेरा पासून घटस्फोट मिळाला असल्याचे समोर आले आहे. एकीकडे तिच्या आयुष्यात ही घटना घडत असताना तिने मराठी सृष्टीत जोरदार कमबॅक केले होते. तर तिकडे परदीप खरेरा आता घटस्फोटा नंतर दुसऱ्याच एका तरुणीच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे. परदीप खरेरा हा गेल्या काही दिवसांपासून एका सोशल मिडिया स्टारला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. विशाखा पनवार ही एक सोशल मीडिया स्टार आहे.

इन्स्टाग्रामवर तिचे ५.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. विशाखाने परदीप सोबत एक रील बनवला होता. त्यानंतर आता हे दोघेही शनी मंदिरात गळ्यात हार घालून एकत्रित पूजा करताना दिसले. या व्हिडिओमुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण आता विशाखाने चक्क परदीपसाठी अख्ख थिएटरच बुक केलेले पाहायला मिळत आहे. एका थिएटरमध्ये विशाखा आणि परदीप दोघेच चित्रपट बघत होते. विशाखाने माझ्यासाठी अख्ख थिएटर बुक केलं असे परदीप त्याने शेअर केलेल्या व्हीडीओत म्हणताना दिसत आहे. त्यावरून हे दोघे लवकरच लग्न करतील अशीही चर्चा त्यांच्या फॅन्समध्ये सुरू आहे.

pradeep kharera with vishaka parmar
pradeep kharera with vishaka parmar

मानसी नाईक सोबत घटस्फोट झाल्यानंतर परदीप आता दुसरे लग्न करण्यासाठी सज्ज झालाय असं म्हटलं जात आहे. दरम्यान मराठी प्रेक्षकांनिही तो घटस्फोटित असल्याच्या कमेंट्स त्याच्या व्हिडिओवर केल्या आहेत. आणि त्याने मानसीला फसवलंय तसं तो तुलाही फसवू शकतो अशा प्रतिक्रिया विशाखाला मिळत आहेत. दरम्यान आता हे दोघे खरंच लग्न करणार की फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोकांचे लक्ष वेधून घेणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button