तान्हाजी चित्रपटानंतर वाटलं तुम्ही गडकिल्यांसाठी काहीतरी मदत कराल पण … मैदान चित्रपटाच्या यशानंतर महिलेची कमेंट चर्चेत
सध्या अजय देवगण अभिनित मैदान चित्रपटाला घवघवीत यश मिळत आहे. गेल्या ६ ते ७ वर्षांत अजय देवगणने काही मोजक्याच चित्रपटात काम केलं पण त्याचे जवळपास सर्वच चित्रपट चांगले गाजले. आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटाला घवघवीत यश मिळवून देणारा अभिनेता म्हणून अजय देवगण सध्या बॉलिवूडचा टॉपचा अभिनेता बनला आहे. मैदान चित्रपटाने आठवड्याच्या आतच जवळपास ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतीय फुटबॉल संघाने आशियाई स्पर्धेत मिळवलेल्या यशाचं ह्या चित्रपटातून वर्णन केलेलं पाहायला मिळत. फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका अभिनेता अजय देवगणने साकारली आहे. भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण युगावर आणि सत्य घटनेवर आधारित हि सुंदर बायोपिक आहे.
१० जानेवारी २०२० रोजी अजय देवगण यांनी बनवलेल्या तान्हाजी ह्या चित्रपटाला देखील घवघवीत यश मिळालं होत. मराठी प्रेक्षकांनी तर थिएटरमधे जाऊन चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला होता. तान्हाजी चित्रपटाने तब्बल ३६७ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाच्या यशानंतर शिवप्रेमींना गडकिल्ले जोपासण्यासाठी अजय देवगण काहीतरी मदत नक्कीच करतील अशी आशा होती पण ती सत्यात उतरली नाही. काही दिवस सोशल मीडियावर तशी चर्चा देखील रंगली होती. आजही अनेक मराठी चित्रपट निर्माते महाराजांवर चित्रपट बनवतात पण मोजकेच कलाकार आणि निर्माते गडकिल्ले संवर्धन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे फक्त स्वतःला मिळणाऱ्या पैश्यांसाठीच हे लोक झटत असतात असं चित्र निर्माण होताना पाहायला मिळत. ह्याच कारणामुळे लोक सोशल मीडियावर भावना व्यक्त करत असतात.
अभिनेते अजय देवगण सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. त्यांनी मैदान चित्रपटाला मिळत असलेल्या यशाबद्दल जनतेचे आभार देखील मानले होते. त्यावर एका महिलेची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात महिला म्हणतेय ” तान्हाजी चित्रपटानंतर वाटलं तुम्ही गडकिल्यांसाठी काहीतरी मदत कराल पण असु द्या जाऊ द्या किमान मैदान चित्रपटाच्या खऱ्या हिरोना तरी तुम्ही मदत करावी अशी अपेक्षा आहे. ” महिलेच्या ह्या कमेंटवर अनेकांनी आपली मत व्यक्त करत अजय देवगणकडे मदतीची अपेक्षा धरली आहे. किमान सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या भावनांमुळे तरी निर्माते आणि अभिनेत्यांना पाझर फुटेल हीच अपेक्षा असते. महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे निर्माते अभिनेते बक्कळ पैसे कमावतात पण त्या खऱ्या हिरोंकडे किंवा त्यांच्या परिवाराकडे हि लक्ष द्यावं त्यांनाही मानधन मिळावं अशी अशा प्रत्येकाला वाटण साहजिक आहेच.