भारतात पुरुष अविवाहित राहण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे चाळीशी ओलांडून गेली तरी लग्नासाठी मुली मिळत नाही हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत. ह्याला करणीतभूत आहेत ते भारतात महिलांचे दिवसेंदिवस घटत चालले प्रमाण. पुरुषांच्या तुलनेने महिलांची संख्या कमी असणं हि खरोखरच गंभीर बाब आहे. ह्याच अति संवेदनशील सध्य वस्तुस्थिती वर आधारीत एक सामाजिक बांधिलकी समज़ुन तयार केलेली शॉर्ट फिल्म दिग्दर्शक डॉ. शशी डोईफोडे यांनी कोणत्याही ओटीटी वर रीलीज न करता सर्व सामान्यांना सहज पाहता यावी ह्या साठी youtube वर रीलीज होत आहे.
मुलींचा जन्मदर खुप घटला असून मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असताना सुद्धा केवळ वंशाला दिवा पाहिजे म्हणून आजही काही लोक सोनोग्राफी करतात आणी काही डॉक्टर आपल्या ज्ञानाचा गैरवापर करत आहेत. तर काही भोंदू बुवा गैरफायदा घेत आहेत अशा विषया वर प्रकाश टाकनारे कथानक आपल्याला ह्या शॉर्टफिल्म मधून पाहायला मिळत आहे. प्रमुख कलाकार – देवमाणूस फेम – अंकुश मांडेकर , अंजली जोगळेकर , सत्यवान शिखरे, रवीना गोगावले तसेच सुप्रसिद्ध कलादिग्ददर्शक वासू पाटील , मृणाल कुलकर्णी , शिल्पा पाटील , रोहीत पंडीत . कॅमेरामन – पोपट सानप , दिग्दर्शक – अमन खान . अशी जबरदस्त स्टारकास्ट ह्या शॉर्टफिल्मला लाभली आहे.
भारतीय सिनेमा चे जनक दादासाहेब फाळकेंनी भारतातील पहिला सिनेमा ३ मे १९१३ ला रीलीज केला त्या दिवसाला अभिवादन म्हणून ३ मे ला म्हणजे आजच्याच दिवशी हि शॉर्टफिल्म प्रदर्शीत झाली आहे. Dr. Doifode film’s present “ग्राफी” हि शॉर्टफिल्म youtube वर उपलब्ध करून दिली गेली आहे.