news

महेश कोठारे म्हणाले, “मी दादा कोंडके यांचा सर्वात मोठा चाहता ! दादांनी दिला त्यांना कॉमेडीचा गुढमंत्र.”

मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनाची कारकीर्द उल्लेखनीय आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील एक खास क्षण उलगडला. महेश कोठारे यांनी कबूल केले की ते दादा कोंडके यांचे सर्वात मोठे चाहते आहेत आणि त्यांनी अनेक वेळा थिएटरमध्ये जाऊन दादांचा ‘सोंगाड्या’ हा चित्रपट पाहिला आहे. झी टॉकीजवर दादा कोंडके यांचे चित्रपट सध्या नेमाने दाखवले जात आहेत आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या आवडत्या नायकाला तीन दशकांनंतर मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची संधी मिळत आहे. झी टॉकीज ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना उत्तम चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रेक्षकांच्या आवडणाऱ्या विनोदी चित्रपटांचे वेळोवेळी पुनःप्रक्षेपण सुद्धा करते . तसं पाहिलं तर अनेक जुन्या काळातील मराठी नावाजलेले कलाकार – दिग्दर्शक हे दादा कोंडके यांच्यापासून प्रेरित झाले आहेत आणि काहींना त्यांच्या सोबत काम करण्याचे भाग्यही लाभले आहे. अशीच एक नावाजलेली व्यक्ती म्हणजे अभिनेता – दिग्दर्शक महेश कोठारे.

dada kondke photo
dada kondke photo

महेश कोठारे यांनी प्रथम ‘प्रीत तुझी माझी’ या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभाकर पेंढारकर यांनी केले होते, जे दादा कोंडके यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यामुळेच ‘प्रीत तुझी माझी’ चित्रपटाच्या प्रीमियरला प्रमुख पाहुणे म्हणून दादा कोंडके आले होते. महेश कोठारे आणि दादा कोंडके यांची ही पहिलीच भेट. महेश कोठारे यांना त्यांच्या पाहिल्याच चित्रपटाच्या प्रीमियरला दादा कोंडके आले, याचा खूपच आनंद झाला. अर्थात ते स्वतःला दादा कोंडके यांचे सर्वात मोठे चाहते मानतात. दादा कोंडके यांनी सुद्धा प्रीमियरनंतर महेश कोठारे यांचे काम पाहून त्यांची वैयक्तिकरित्या प्रशंसा केली आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले. तेव्हा दादा कोंडके यांनी दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांना एक महत्त्वाचा सल्ला सुद्धा दिला, “चित्रपटाच्या विनोदी दृश्यात कधीही दोन मिनिटांचा वेळ ठेवू नका, कारण हास्याच्या दृश्यांची सातत्यता अत्यंत महत्त्वाची आहे.” हा सल्ला महेश कोठारे यांच्यासाठी सुद्धा खूप मोलाचा ठरला आणि त्यांनी तो त्यांच्या चित्रपटांमध्येही अमलात आणला. महेश कोठारे यांना दादा कोंडके यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे . त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरला दादा कोंडके यांच्या उपस्थितीने त्यांना खूप आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी त्यांच्या करियरमध्ये या सल्ल्याचा फायदाही करून घेतला.

dada kondke and ashok saraf pandu hawaldar
dada kondke and ashok saraf pandu hawaldar

श्री. बवेश जानवलेकर, व्यवसाय प्रमुख, झी टॉकीज, झी युवा, झी चित्रमंदिर, आणि प्रमुख, झी स्टुडिओज मराठी म्हणाले, “दादा कोंडके यांच्या चित्रपटातील विनोद आणि कथा आजच्या प्रेक्षकांनाही तितक्याच आवडतात. वैयक्तिकरित्या, मला दादांच्या एकूण कामाचा, मराठी चित्रपट आणि मराठी प्रेक्षकांच्या आवडी निवडी समजण्यामध्ये मोठी मदत झाली आहे आणि त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे ही आमच्यासाठी म्हणजेच झी टॉकीज वाहिनीसाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांच्या जीवनातील, महाराष्ट्राच्या महानायकाला जपण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही झी टॉकीजवर आमच्या प्रेक्षकांसाठी दादा कोंडके यांचे चित्रपट पुन्हा आणले आणि टॉकीजच्या प्रेक्षकांना हे चित्रपट पुन्हा पाहायला आवडतात. फक्त तेवढेच नव्हे तर सध्या झी टॉकीज दादा कोंडके यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांना रंगीत करण्याचा स्तुत्य प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आणि या प्रयोगासाठी प्रसाद कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडची साथ आम्हाला लाभली, ज्यांनी हा शिवधनुष्य उचलला. सोशिअल मीडिया वरही आम्हाला कलर प्रीमियरचे अनुकूल अभिप्राय लाभत आहेत. झी टॉकीज हे प्रेक्षकांना केंद्र धरून चालणारे आणि नवकल्पनांवर भर देणारे चॅनल आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी उत्तम चित्रपट देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच झी टॉकीज ही महाराष्ट्रातील क्रमांक १ ची मराठी चित्रपट वाहिनी बनली आहे.” आता तुम्ही दादा कोंडके यांचे ‘एकटा जीव सदाशिव’ आणि ‘आंधळा मारतो डोळा’ ह्या चित्रपटांचा जागतिक कलर टेलिव्हिजन प्रीमियर, ११ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वर पाहू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button