लाखो महिलांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या लीज्जत पापडच्या संस्थापिका जसवंतिबेन पोपट याचे वयाच्या ९३ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गिरगाव येथील हलीया लोहाना या इमारतीत त्या वास्तव्यास होत्या. काही वर्षांपूर्वीच जसवंतीबेन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जसवंतीबेन पोपट यांनी लिज्जत पापडचा गृहउद्योग सुरू करण्यासाठी ८० रुपये उधारीवर घेतले होते. लिज्जत पापड हे आता घरगुती नाव बनले आहे. इतकंच नाही तर लोक बाजारात जाऊन पापड विकत घेतात तेव्हा ते लिज्जत पापड असेच नाव सांगतात एवढी या पापडाची लोकप्रियता वाढली आहे. मुंबईतील गिरगाव परिसरात सुरुवातीला हा व्यवसाय सुरू झाला होता. जसवंतीबेन पोपट यांना हा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणाऱ्या इतर सात महिलांमध्ये पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकाणी आणि जयाबेन विठलानी यांचा समावेश आहे.
१५ मार्च १९५९ रोजी जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारनदास कुंडलिया, बानुबेन यांच्यासह सात जणींनी हा व्यवसाय उभारला होता. एन. तन्ना, लगुबेन अमृतलाल गोकाणी, जयाबेन व्ही. विठ्ठलानी आणि चुताडबेन अमिश गावडेम हे दक्षिण मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी एका जुन्या इमारतीच्या जवळ जमले आणि त्यांनी पापडांची चार पाकिटे विकण्यासाठी तिथे आणली. तीन महिन्यांत, पापडाची गुणवत्ता आणि चव अनुकूल ठरल्याने काम करणाऱ्या महिलांची संख्या सातवरून २५ झाली. पण, महिलांना पावसाअभावी छतावर पापड सुकवण्यापासून मोठी अडचण निर्माण झाली. यावर उपाययोजना करण्यात आली. लिज्जत पापडचा अविश्वसनीय विस्तार सुरू होण्यापूर्वी त्यांना मोठे अपयश सहन करावे लागले पण त्यानंतर या उद्योगाने देशभरात मोठी झेप घेतलेली पाहायला मिळाली. निर्यातीत भरभराट झाली. ज्या महिला या गृहउद्योगत सहभागी झाल्या त्यांच्या कामाचे वेळोवेळी पुरस्कार देऊन कौतुक करण्यात येऊ लागले. यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन मिळू लागले. ८० रुपयांपासून सुरू केलेला जसवंतीबेन यांचा हा बिजनेस कोट्यवधींची उलाढाल करत आहे. त्याचमुळे जसवंतीबेन पोपट यांच्या निधनाने सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.