लक्ष्मी निवास मालिकेत या अभिनेत्याची होणार एन्ट्री…हिंदी सृष्टी गाजवल्यानंतर मराठी मिळतोय लोकप्रियता
झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सोमवार ते शनिवार १ तास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेचं। खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक कलाकारांना यात अभिनयाची संधी मिळाली आहे. अक्षया देवधर, दिव्या पुगावकर, हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, स्वाती देवल, निखिल राजेशिर्के, मीनाक्षी राठोड, दुश्यंत वाघ असे बरेचसे सेलिब्रिटी मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितच एक मोठं कुटुंब या मालिकेला लाभलेलं आहे. पण राजेश शृंगारपूरे आणि राधिका विद्यासागर यांचा मालिकेत अपघात दाखवल्याने त्यांचा या मालिकेतून लगेचच पत्ता कट करण्यात आला.
त्यामुळे आता मालिकेत नवनवीन पात्रांची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. सिद्धीराज गाडेपाटील आणि भावनाची केमिस्ट्री या मालिकेत पाहायला मिळणार असून जान्हवीच्या आयुष्यात लवकरच एक तरुण येणार आहे. लवकरच मालिकेत जयंत कानिटकरच्या पात्राची एन्ट्री होत आहे. ही भूमिका अभिनेता मेघन जाधव साकारताना दिसत आहे. मेघन जाधव ने याअगोदर रंग माझा वेगळा मालिकेत काम केले होते. पण त्याअगोदर त्याने हिंदी मालिकाही गाजवल्या आहेत. बालकलाकार म्हणून मेघन जाधव अनेक हिंदी मालिकेत झळकला आहे.
हे देखील वाचा –
रंग माझा वेगळा मालिका अभिनेत्रीने अभिनयाच्या जोडीला सुरु केला स्वतःचा नवा हटके बिजनेस
मेघन जाधव आहे ह्या अभिनेत्रींच्या प्रेमात
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेता मंदार जाधव आणि मेघन जाधव हे दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघांनीही त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून हिंदी मालिकेपासून केली होती. हिंदीत स्वतःची ओळख बनवल्यानंतर हे दोघेही मराठी सृष्टीत परतले आहेत. मेघनची आता मराठी मालिकेचा नायक म्हणून नवी ओळख बनवत आहे. त्यासाठी त्याचे अभिनंदन आणि जयंत कानिटकरच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा!.