serials

लाखात एक आमचा दादा मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याच्या भावाची एन्ट्री.. डॅडीच्या नव्या खेळीमुळे तेजूचं आयुष्यात येणार वादळ

झी मराठी वाहिनीच्या लाखात एक आमचा दादा या मालिकेत रंजक घडामोडी घडताना दिसणार आहे. इतके दिवस सुर्याच्या बाजूने बोलणारे डॅडी आता त्यांचा खरा चेहरा समोर आणणार आहेत. सूर्याची बहीण तेजूचं लग्न आपल्याच मुलाशी व्हावं यासाठी डॅडी एक नवी चाल खेळणार आहेत. तेजुसाठी एक नवीन स्थळ ते शोधून आणणार आहेत. जेणेकरून सुर्या त्याला विरोध करेल आणि तेजुचं लग्न शत्रुघ्नसोबत लावून देईल.

lakahat ek amcha dada daddy and teju
lakahat ek amcha dada daddy and teju

त्यामुळे आता मालिकेत एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान या नव्या पात्राचा एंट्रीमुळेच तेजूचं आयुष्य बदलणार आहे. हे नवीन येणारं पात्र भोळसट वाटत असलं तरी तो सुर्या आणि तेजूचं मन जिंकून घेईल अशी आशा आहे. पण ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?. कारण या अभिनेत्याने झी मराठी वरूनच स्वतःची ओळख बनवली आहे. हा अभिनेता आहे अधोक्षज कऱ्हाडे. हो अधोक्षज हा लोकप्रिय अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडे याचा धाकटा भाऊ आहे.

actor sankarshan karhade famiily photo
actor sankarshan karhade famiily photo

झी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर तो पिंकीचा विजय असो या मालिकेत बंटीचे पात्र साकारताना दिसला. संकर्षण आणि अधोक्षज या दोघा भावांनी शाळेत आल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान संकर्षणने मराठी सृष्टीत चांगला जम बसवलेला दिसला.

sankarshan karhade brother adhokshaj in lakhat ek amacha dada serial
sankarshan karhade brother adhokshaj in lakhat ek amacha dada serial

आता अधोक्षजही मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्या आवाजात संकर्षण सारखाच गोडवा आहे त्यामुळे मालिकेत तो उत्तम काम करताना दिसेल अशी आशा आहे. लाखात एक आमचा दादा या मालिकेत त्याला एक महत्वाची भूमिका मिळाली आहे. अधोक्षजच्या एंट्रीमुळेच तेजूच्या आयुष्यात अनेक बदल घडलेले पाहायला मिळतील. त्याच्या येण्याने मालिकेला निश्चितच एक नवे वळण मिळणार आहे. या नवीन मालिकेसाठी अधोक्षजला खूप खूप शुभेच्छा!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button