news

जिच्यामुळे आम्ही घर घेतलं त्या मांजरीच्या पावलांचे ठसे दारावर….अभिनेत्रीने घराचे फोटो शेअर करत

आपण जिथे काम करतो त्याठिकाणी आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांच्या या इच्छा पूर्णत्वास आलेल्या पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर सह ऋतुजा बागवे यांनी स्वतःचं घर खरेदी केलं. आता रात्रीस खेळ चाले ३ मधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर हिनेही आपल्या हक्काचं घर खरेदी करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कृतिका तुळसकर हिच्या अगोदर शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकर हिने गाजवली होती. त्यामुळे या भूमिकेत प्रेक्षकांनी कृतिकाला थोडा कमी प्रतिसाद दिला होता. मात्र कृतिकाने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यश मिळवले होते.

krutika tulaskar photos
krutika tulaskar photos

कृतिका ही चित्रपट मालिका अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती मराठी इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये दिग्दर्शक विशाल देवरुखकर सोबत तिने लग्नगाठ बांधली होती. विशाल आणि कृतिकाने मिळून बोरिवली येथे स्वतःच घर खरेदी केलं आहे. मुंबईत आल्यानंतर कृतिकाने पेइंग गेस्ट म्हणून आपला प्रवास सुरु केला होता. त्यानंतर ती भाड्याच्या घरात राहिली. मध्ये भरपूर काळ गेला आणि आता स्वतःच्या घरात गृहप्रवेश करत भूतकाळातील प्रवासावर नजर फिरवली. हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून गेला असे कृतिका म्हणते, पण आता नवीन घर आणि तेवढीच जबाबदारी असल्याने आता मी एक नवीन आनंद अनुभवत आहे असे कृतिका म्हणते. कृतिकाने तिच्या मांजरीसाठी हे घर खरेदी केल्याचं म्हटलं आहे.

krutika tulaskar new home
krutika tulaskar new home

त्याचे कारण ती येत्या काही दिवसात व्हिडिओद्वारे सांगणार आहे. भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात आम्ही फक्त चिकूमुळेच आलो, तिच्यामुळे आम्ही स्वतःच घर घेऊ शकलो , त्याचमुळे तिच्या पावलांचे ठसे आमच्या दारावर आहेत, तीच या घराची खरी मालकीण आहे असे कृतिका म्हणते. कृतिकाच्या म्हणण्यानुसार प्राणी प्रेमींना भाड्याच्या घरात राहण्यासाठी अनेक बंधनं लादली जातात. त्याचाच एक भाग म्हणून कृतिकाने आता स्वतःच घर खरेदी केलं आहे हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट होते. याचा खुलासा ती लवकरच करणार आहे तूर्तास कृतिकाच्या या नव्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button