प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं आलिशान घर पाहिलंत … पहा कस आहे इंदुरीकर महाराज्यांच घर आणि परिसर
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे आपल्या विनोदी शैलीतून महाराष्ट्रभर प्रबोधनाचे काम करतात. त्यांच्या कीर्तनाचे करोडो लोक चाहते आहेत. इंदुरीकर महाराज यांचे मूळ नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख असे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचं गाव, याच गावाच्या नावावरून ते इंदोरीकर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. बी एस्सी बीएड अशी पदवी मिळवलेल्या निवृत्ती देशमुख यांनी कीर्तनकार होण्याचा मार्ग पत्करला. यात त्यांना मोठे यश मिळत गेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण इंदोरीकर महाराज एका कार्यक्रमासाठी ७० हजार ते १ लाख रुपये इतके मानधन घेतात असे बोलले जाते. पण यावरून त्यांच्यावर टीका सुद्धा झाली होती. एकाच दिवसात त्यांनी तीन तीन कीर्तन केले आहेत याचे दाखले तुम्हाला मिळतील. त्यामुळे इंदोरीकर महाराजांनी या क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. या यशाला हुरळून न जाता त्यांनी आपले राहणीमान सर्वसामान्यांप्रमाणेच ठेवले आहे.
जेव्हा कीर्तन नसेल तेव्हा ते आपल्या शेतात राबतात, गुरा ढोरांची काळजी घेतात, शेण सारा काढतात. महाराजांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावात मुलांसाठी मोफत शाळा सुरू केल्या आहेत. याशिवाय घराजवळच गो सेवा देखील त्यांनी सुरू केलेली आहे. महाराजांचे घर देखील दिसायला अतिशय सुरेख आहे. प्रशस्त जागेत त्यांनी आपले हे घर दिमाखात उभे केले आहे. “संत कृपा” असे त्यांनी आपल्या घराला नाव दिले आहे. विठ्ठल मंदिर ओझर खुर्द जवळ हे घर आहे. घरासमोर तुळशीवृंदावन सजवलेले तुम्हाला पाहायला मिळेल. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच एका मोठा हॉल आहे ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच हॉल मध्ये एका भिंतीवर महाराजांना मिळालेले पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. प्रशस्त आणि हवेशीर निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे हे टुमदार घर सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. इंदोरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख यादेखील कीर्तनकार आहेत. इंदोरीकर महाराजांईतकी त्यांना प्रसिद्धी मिळालेली नसली तरी लोक त्यांचे कीर्तन आवडीने पाहतात. निवृत्ती महाराजांचा मुलगा देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अध्यत्मतेच्या दिशेने वळला आहे. कृष्णा महाराज इंदोरीकर हा बालकीर्तनकार म्हणून ओळख मिळवत आहे.
गेली अनेक वर्षे इंदोरीकर महाराजांनी कीर्तन क्षेत्रात आपला जम बसवला आहे. गावोगावी खेडोपाडी त्यांचे कीर्तन ऐकायला लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पण या सर्वांतून इंदुरीकर महाराजांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे ते मोठ्या अडचणीत देखील सापडले होते. आजवर कौतुकाचे बोल आणि टीकेचे धणी ठरत ते अशा सर्वच गोष्टींना सामोरे जात अध्यात्मच्या मार्गातून यशाचा पल्ला गाठत राहिले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमा बद्दलही एक विधान केले होते. गौतमी पाटील तीन गाण्यांवर नाचण्यासाठी ३ लाख रुपये घेते आणि आम्ही टाळ वाजवून पाच हजार रुपये मागितले तरी लोकं नावं ठेवतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा होतो, लोकांचे गुडघे फुटतात आणि आम्हाला टाळ वाजवून काही मिळत नाही, साधं संरक्षणही दिलं जात नाही. असे म्हणून त्यांनी नव्या वादाला तोंड उघडले होते. पण मी इंदुरीकर महाराजांची मोठी फॅन आहे असे म्हणून गौतमीने या वादावर पडदा टाकला होता.