news

या मराठी अभिनेत्रीला ओळखणे झाले कठीण…घटस्फोटानंतर लूकमध्ये केला कमालीचा बदल

दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर आपल्याला घटस्फोट मिळाला अशी बातमी मराठी सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केली होती. “देर लगी लेकीन मैने अब है जीना सीख लिया” असे म्हणत तिने या बंधनातून सुटका झाली असे म्हटले होते. यानंतर मात्र या अभिनेत्रीने डोक्यावरचे केस बारीक कापुन तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल घडवून आणला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्नेहा चव्हाण आहे. स्नेहा चव्हाण हिने लाल ईश्क, सिनिअर सिटीझन, ७०२ दीक्षित अशा चित्रपटातून काम केले होते. स्नेहाने २०२१ साली घरगुती हिंसाचार प्रकरणी नवरा अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपला मानसिक छळ केला जातोय, मारहाण केली जातेय असे आरोप तिने अनिकेत विश्वासराववर लावले होते. अनिकेत विश्वासराव हा देखील अभिनेता आहे.

aniket vishwasrao with wife sneha chavan
aniket vishwasrao with wife sneha chavan

त्याने पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, बस स्टॉप, बघतोस काय मुजरा कर अशा चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात एकत्रित काम करत असताना स्नेहा सोबत त्याची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. २०१८ साली दोघांनी मोठ्या थाटात लग्नही केले. मात्र अवघ्या दोन वर्षांतच दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान स्नेहा पुण्यात आपल्या आईकडे राहत होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये स्नेहाने अनिकेत विरोधात तक्रार दाखल केली. अनिकेत पेक्षा आपण वरचढ ठरतोय म्हणून तो आपल्याला मारहाण करतो आणि मानसिक छळ करतो असे तिने आरोपपत्रात म्हटले होते. त्यानंतर स्नेहाने केवळ पोटगी मिळवण्यासाठी हा बनाव रचला असे अनिकेतने एका मुलाखतीत म्हटले होते. मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे आणि त्याची प्रोसेस सुरू आहे असे तो त्यावेळी म्हणाला होता. अखेर दोन वर्षांनंतर म्हणजेच जून २०२३ रोजी कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केला.

sneha chavan marathi actress new look
sneha chavan marathi actress new look

या बंधनातून आता आपली सुटका झाली असे म्हणत स्नेहाने त्यावेळी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच स्नेहाने डोक्यावरचे केस बारीक करून तिच्या लूकमध्ये बदल केला. स्नेहा सध्या या लूकमध्ये खूपच वेगळी दिसत असल्याने तिला आता ओळखणेही कठीण झाले आहे. स्नेहाची आई राधिका चव्हाण या देखील अभिनेत्री आहेत. ‘ये है चाहतें’ या मालिकेतून त्या आजीची भूमिका साकारत आहेत. आई, वडील आणि भाऊ हेच आपले आधारस्तंभ आहेत असे ती म्हणते. आई वडिलांच्या आपल्याला या कठीण काळात सावरण्याचे काम केले आहे त्यामुळे हेच माझ्यासाठी सर्वस्व आहेत असे ती म्हणते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button