देवमाणूस ही झी मराठीची मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड याने मुख्य भूमिका साकारली होती. खरं तर ही भूमिका विरोधी होती पण किरणच्या अभिनयावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवले होते. मधल्या काळात किरणने लग्न मोडल्याची खंत देखील बोकून दाखवली होती. यामुळे तो खूप डिप्रेशन मध्येही गेलेला होता. पण कामामुळे व्यस्त राहिलो आणि या दुःखातून मी स्वतःला सावरलं अशी तो कबुली देताना दिसतो. पण आता हा किरण गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. किरण गायकवाड ला अभिनेत्री कडून प्रेमाची कबुली मिळाली आहे. ही अभिनेत्री आहे तू चाल पुढं मालिका फेम वैष्णवी कल्याणकर.
तू चाल पुढं मालिकेत तिने मयुरीची भूमिका साकारली होती. तर देवमाणूस २ मध्ये ती किरण सोबत छोट्या पडद्यावर झळकली होती. एक खास फोटो शेअर करताना किरण म्हणतो की, “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “ मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” ! वैष्णवी कल्याणकर!…” अशा आशयाची एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. ती हो म्हणाली असेही टॅगलाईन देताना त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
पण किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकरसोबत खरंच लग्न करणार की “होम मिनिस्टर” नावाने त्यांचा कुठला प्रोजेक्ट येणार ? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण यागोदरही किरण गायकवाड ने चर्चेत राहण्यासाठी मोनालीसा बागल सोबतचे काही खास फोटो शेअर केलेले पाहायला मिळाले होते. त्यावेळी त्यांची झी मराठीवर एक मालिका येणार होती. त्यामुळे असाच काही एक प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा हा एक प्रकार असावा असेही या पोस्टबद्दल म्हटलं जात आहे. यावरचं खरं उत्तर येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.