अखेर अनुष्काचं सत्य येणार समोर…. बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी किर्लोस्कर कुटुंबाला उध्वस्त
झी मराठीच्या पारू या मालिकेत आता नवं वादळ येणार आहे. किर्लोस्कर कुटुंब आदित्यचं लग्न अनुष्का सोबत जुळावं म्हणून तिची परीक्षा घेत आहे. अहिल्यादेवी अनुष्कासमोर वेगवेगळ्या प्रकाची आव्हानं उभी करत आहे. या सगळ्या आव्हानाला ती खरी उतरल्याने अहिल्यादेवीचा तिच्यावर आता पूर्ण विश्वास बसला आहे. त्यामुळे मालिकेत अनुष्का आणि आदित्यच्या लग्नाची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. किर्लोस्कर कुटुंबाची सून म्हणून अनुष्कावर शिक्कामोर्तब होत असतानाच आता अनुष्काचा खरा चेहरा समोर येणार आहे. अनुष्का ही दिशाची बहीण आहे.
तिचं प्रीतमसोबत लग्न मोडल्याने या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्कर कुटुंबात दाखल होऊ पाहत आहे. अनुष्काची मालिकेत एन्ट्री होणार तेव्हा ही अनुष्का दिशाला भेटायला जेलमध्ये गेलेली होती. तिथे ती तिच्या अपमानाचा बदला घेणार असे आश्वस्त करताना दिसली. अहिल्यादेवीचं मन कसं जिंकता येईल हे अगोदर तिने जाणून घेतलं. आणि आता ती सगळ्यांचा विश्वास मिळवताना दिसत आहे. पण आता पारूला तिच्या कटकारस्थानाचा लवकरच उलगडा होणार आहे. अनुष्का दिशाची बहीण आहे आणि ती किर्लोस्कर कुटुंबाविरोधात षडयंत्र रचत आहे याची तिला जाणीव होणार आहे. पण आता अनुष्का पूर्णपणे तयारीनिशी आल्याने पारूला सुद्धा ती तोंडघशी पाडणार अशी चिन्ह समोर दिसणार आहेत.
हे नवं वादळ पारू कसं उलटवून लावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. अर्थात मालिकेतला हा ट्विस्ट प्रेक्षकांना अपेक्षित होताच..कारण दिशा जेलमध्ये जाणार त्यावेळी तिने मी पुन्हा येईल आणि किर्लोस्कर कुटुंबाला उध्वस्त करेन असे भाकीत वर्तवले होते. त्यामुळे कथानकाचा हा भाग प्रेक्षकांना अपेक्षित होताच. पण आता इथेही अहिल्यादेवी डोळेझाकून अनुष्काची बाजू घेणार हेही प्रेक्षकांच्या लक्षात आले आहे. अर्थात या सगळ्यांमध्ये पारू मात्र खोटी ठरणार हे गृहीत धरूनच प्रेक्षक पुन्हा ही मालिका त्याच आपुलकीने पाहणार आहेत.