२०२१ मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. भुवन बदायकर नामक एक व्यक्ती त्याच्या गाडीवरून शेंगदाणे विकत होता. ‘कच्चा बदाम’… गाणे म्हणत शेंगदाणा विकण्याची त्याची ही हटके स्टाईल खूपच व्हायरल झाली होती. या नंतर कच्चा बदाम नावाचे गाणे देखील तयार करण्यात आले आणि त्या गाण्यावर कोट्यवधी तरुणींनी रील बनवून प्रसिद्धी मिळवली. यातुनच प्रसिद्धी मिळवलेली अंजली अरोरा ही पुढे जाऊन अनेक गाण्यांमध्ये तसेच रिऍलिटी शोमध्ये पाहायला मिळाली. अंजली आरोराला कच्चा बदाम गर्ल म्हणूनही ओळख मिळाली. अवघ्या २२ व्या वर्षी अंजलीने ग्लॅमरस दुनियेत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. आणि चक्क २४ व्या वर्षी तिने ४ कोटींचा आलिशान बंगला बांधून सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
मुंबईत घर घेणे हे अनेकांचे स्वप्न असतं. सामान्य लोकांसाठी त्यांचे हे स्वप्न पूर्ण करणे मुळीच सोपे नाही. पण अल्पावधीतच अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कच्चा बदाम फेम अंजली आरोराचेही हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षीच तिने ही कमाल घडवून आणली आहे. काही दिवसांपूर्वीच अंजलीने तिच्या ४ कोटी किंमत आलेल्या घराची वास्तुशांती करून गृहप्रवेश केला आहे. अंजलीने तिच्या या आलिशान घराचे काही व्युव्ह सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तीन मजल्याच्या तिच्या या घराला प्रशस्त हॉल आहे. हॉलला लागूनच देवघरासाठी एक खास रूम बनवण्यात आली आहे. तिच्या या आलिशान घराला तिने पांढऱ्या रंगाच्या थिमला प्राधान्य दिले आहे. तिचे हे आलिशान घर ४ कोटींच्या जवळपास असल्याचे बोलले जाते. दिल्ली मध्ये तिने हे आलिशान घर खरेदी केले आहे.
कच्चा बदाम या रीलवर डान्स करून प्रसिद्धी मिळवलेल्या अंजली अरोराला लॉक अप रिऍलिटी शोमध्ये पाहिले गेले. या शोमधून तिने टीव्ही माध्यमातून पदार्पण केले होते. काही पंजाबी गण्यातूनही तिला झळकण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर अंजलीने एक लक्झरी गाडी खरेदी करून सगळ्यांना बुचकळ्यात पाडले होते. अंजलीचा एक एमएमएस लिक झाला होता यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या व्हिडीओ नंतर अंजली दुसरा व्हिडीओ कधी शेअर करते असे म्हणत तिला ट्रोल करण्यात आले होते. खरं तर याच कारणामुळे अंजलीला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. अवघ्या २४ व्या वर्षी कोट्यवधींचे घर खरेदी करणारी अभिनेत्री म्हणून तिला नावाजण्यात येत आहे. या यशाबद्दल चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या लोकांनी तिचे अभिनंदन केले आहे.