marathi tadka

आईच्या मैत्रिणीने मला त्याचा फोटो दाखवला होता तेंव्हा… मग मी स्वतः त्याला फोन लावला आणि औपचारिक गप्पानंतर

नोव्हेंबर महिन्यात पूजा सावंतने तिची एंगेजमेंट झाली असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. पूजा कोणाशी लग्न करतीये हे तिने गुपित ठेवले होते पण हा मिस्ट्रीमॅन कोण आहे? हे प्रश्न पाहून पूजाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे फोटो आणि त्याचे नाव रिव्हील केले होते. सिद्धेश चव्हाण सोबत पूजाने एंगेजमेंट केली हे समजताच अनेकांना या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली. हे दोघे पहिल्यांदा कुठे भेटले? त्यांचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले. या सर्वांचे उत्तर पूजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. पूजा आणि सिद्धेशची भेट झाली ती अरेंजमॅरेज सेटअप मध्ये त्यामुळे तिचे सिद्धेशसोबत हे अरेंजमॅरेज असणार आहे. पूजा अभिनेत्री आहे हे सिद्धेशला मुळीच माहीत नव्हते. त्यांच्या या प्रेमाची गोष्ट नेमकी कशी जमली हे जाणून घेऊयात…

siddhesh and pooja sawant
siddhesh and pooja sawant

पुजाच्या आईची एक मैत्रीण आहे त्यांनी सिद्धेशचा फोटो पूजाला दाखवला. सिद्धेशचा फोटो समोर पाहताच पूजा त्याच्या प्रेमातच पडली. सिद्धेशचा फोटो पाहताक्षणी पूजाला तो आवडला होता. त्यानंतर पूजाने सर्वात अगोदर सिद्धेशला फोन लावला. औपचारिक गप्पानंतर हे दोघे अनेक दिवस फोनवरच बोलू लागले होते. काही महिने गेल्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले. दरम्यान पूजा सावंत ही अभिनेत्री आहे हे सिद्धेशला अजिबातच ठाऊक नव्हते. सिद्धेशच्या आईने ‘तुला एका अभिनेत्रीचं स्थळ आलंय’ असे सांगितले होते. त्यानंतर सिद्धेशनेही पूजा सावंतचे फोटो पाहिले. सिद्धेशला पूजा सावंत अभिनेत्री आहे हे मुळीच माहीत नव्हतं तेव्हा त्याने तिचे चित्रपट आणि काही गाणी पाहिली होती. याबद्दल पूजा म्हणते की, “सिद्धेशने माझे फोटो पाहिले, आय होप त्यालाही ते आवडले असतीलच म्हणूनच आम्ही पुढे एकमेकांशी बोलू लागलो.

pooja sawant with siddhesh
pooja sawant with siddhesh

आमची ओळख गेल्या अनेक महिन्यांपासून होती. सुरुवातीला आम्ही फक्त फोनवरच बोलत होतो . मी माझं त्याच्यासोबत असलेल हे नातं लपवून ठेवलं होतं. हे अनेकांना माहीत नसल्यामुळेच मी आणि सिद्धेश दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकलो. यादरम्यान आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवला, एकमेकांना जाणून घेतलं. आणि जेव्हा वाटलं की आता आपण एकमेकांसोबत लग्न करायला हरकत नाही तेव्हा मी ते आईला सांगितलं.” पूजा ने इंडस्ट्रीतील काही खास सेलिब्रिटींनाच सिद्धेशबद्दल सांगितलं होतं. वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, गश्मीर महाजनी आणि पत्नी गौरी महाजनी यांनाच पूजा सिद्धेशसोबत लग्न करणार आहे हे ठाऊक होतं. म्हणूनच गौरी महाजनी हिने तिच्या होणाऱ्या जावयाबद्दल “माझा जावई” अशी एक खास कमेंट केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button