serials

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर इरिनाला मिळाली अभिनयाची संधी….या मालिकेत होणार दमदार एन्ट्री

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत ८ सदस्य बाहेर पडले आहेत. बिग बॉसच्या शोमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर कलाकारांना काम मिळते. खरं तर त्यांचा तो एक प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा मार्गच असल्याने बरेचजण या शोमध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. अशातच बाहेर पडलेल्या ८ सदस्यांमधून काही कलाकारांना अभिनयाची नवीन संधीच मिळाली आहे. इरिना रुडाकोवा ही बिग बॉसच्या घरात आली तेव्हा हिला कशाला घेतलं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण कालांतराने इरिना मराठी उत्तम बोलू शकते आणि ती आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करते असे तिच्या कृतीतून दिसून आले. त्यामुळे अनेकांना इरिना आवडू लागली.

irina rudakova and dhananjay powar
irina rudakova and dhananjay powar

परदेशी असूनही इरिनाला आपली मराठी भाषा अवगत आहे यातच सर्वकाही दिसून आले. पण आता याच इरिनाला तुम्ही मालिका सृष्टीतही पाहणार आहेत. इरिनाला नुकतीच अभिनयाची संधी देऊ केली आहे ती कलर्स मराठीच्या इंद्रायणी या मालिकेने. कलर्स मराठी वाहिनीने इरिनाला छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आणले आहे. इंद्रायणी ही चिमुरडी आता परदेशी पाहुणीला भेटणार आहे. ही परदेशी पाहुणी इंद्रायणीचा शोध घेत विठुच्या वाडीत दाखल झाली आहे. आता ही इंद्रायणी या परदेशी पाहिणीला कशा प्रकारे मदत करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान इंद्रायणी मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. सांची भोयार हिने इंद्रायणीची भूमिका सुरेख वठवली आहे.

या मालिकेत अनिता दाते हिने विरोधी भूमिका साकारलेली पाहायला मिळत आहे. आनंदीबाई इंद्रायणीच्या हक्काचा वाडा बळकावू पाहत आहे. पण व्यंकू महाराज नेहमी इंद्रायणीच्या मदतीला धावून जाताना दिसतात. त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यात आता इरिनाची या मालिकेतून मराठी सृष्टीत एन्ट्री होत आहे. त्यामुळे तिची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button