marathi tadka

मंत्र फुकून बॉल टाकताच उडाली विकेट… मांत्रिक पांड्या म्हणून सोशल मीडियावर हार्दिक जोरदार चर्चेत

काल झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने एकतर्फा विजय मिळवत क्रमवारीत आपलं स्थान बळकट केलेलं पाहायला मिळत आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम पाकिस्तानला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानने सुरवात चांगली केली पण नंतर एकामागून एक गाडी बाद झाल्याने अवघ्या ४२ ओव्हरमध्ये सर्व बाद १९१ धाव केल्या. १९२ धावांचा पाठलाग करताना ३ गाडी बाद ३०.३ ओव्हरमध्ये हा सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८३ धावा केल्या.रोहितच्या साथीला श्रेयस अय्यरने ५३ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाकडून ह्या सामन्यांमध्ये कोणाही खेळाडूला १ हि षटकार (६) मारता आला नाही. तर भारताच्या रोहित शर्माने उत्तम खेळी करत एकट्यानेच ६ षटकार मारले.

hardik pandya ball to pakistan cricketer
hardik pandya ball to pakistan cricketer

भारताने हा सामना सहज जिंकला पण हे सगळं बाजूला सारत सोशल मीडियावर हार्दिक पांड्या चांगलाच चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. त्याच कारण देखील तसेच आहे. भारताने टॉस जिंकत पाकिस्तानला बॅटिंग दिली. सुरवातीपासूनच पाकिस्तानी खेळाडू चांगली करताना पाहायला मिळत होते. १२ व्य ओव्हरला पाकिस्तान ७२ धावा करत आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळत होता. १३ वि ओव्हर टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला आणि त्याला देखील उमाम उल हक याने चौकार मारला. चौकार मारल्यांनंतर हार्दिक चक्क बॉलवर काहीतरी मंत्र (बडबडताना) पाहायला मिळाला. इतकंच नाही तर त्याच ते बडबडन झालं नाही त्याने बॉलवर फुंकर देखील मारली. आणि त्याच बॉल वर उमाम उल हक ह्याची विकेट पडली.

mantrik pandya funny photo
mantrik pandya funny photo

हा सगळं प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. ह्यावर अनेक मिम्स देखील बनलेले तुम्ही पहिले असेल. हार्दिक पंड्याचा उल्लेख चक्क मांत्रिक पांड्या म्हणून मजा घेताना नेटकरी पाहायला मिळत आहेत. हार्दिक पांड्याने नेमका कोणता मंत्र म्हटलं असेल ज्यामुळे त्याला उमाम उल हक याची विकेट मिळाली ह्यावर अनेकांनी मजेशीर उत्तरे दिलेली पाहायला मिळत आहे. ह्या पूर्वी कधीही असा सिन पाहायला मिळाला नाही जो कालच्या सामन्यात हार्दिक पांड्याने घडवून आणला. मग काय चर्चा तर होणारच कि…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button