आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक काळ गाजवलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री अभिनय क्षेत्र सोडून सध्या परदेशात स्थायिक झालेल्या पाहायला मिळत आहेत. यातील काही अभिनेत्रींच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात. मृणाल दुसानिस हिने तिच्या सोज्वळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. माझिया प्रियाला प्रित कळेना, तू तिथे मी, अस्स सासर सुरेख बाई, हे मन बावरे अशा मोजक्या मालिकेतून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. नीरज मोरे सोबत लग्न झाल्यानंतर मृणाल काही काळासाठी परदेशात गेली होती मात्र त्यानंतर तिने हे मन बावरे ही मालिका साकारली. या मालिकेनंतर मृणाल नीरज सोबत अमेरिकेत स्थायिक झाली. मुलगी नूरवीच्या जन्मानंतर आता ती पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. कारण आता घर संसारात रमलेल्या मृणालवर मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. ती अभिनय क्षेत्रात परतण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मात्र भविष्यात चाहत्यांच्या आग्रहाखातर तिला जर कुठल्या प्रोजेक्टमध्ये काम करायचेच असेल तर तिचे नक्कीच स्वागत केले जाईल.
मृणाल दुसानिस पाठोपाठ मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री परदेशात स्थायिक झालेली पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री आहे उमा ऋषीकेश पेंढारकर, भालजी पेंढारकर यांची ती नातसून आहे. उमा ऋषीकेश हिने नृत्य तसेच गायनाचे धडे गिरवले आहेत. संगीत नाटकातून काम करत असताना तिला स्वामिनी मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. अग्गबाई सुनबाई, योगयोगेश्वर जयशंकर अशा मालिकांमधून उमाने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. योगयोगेश्वर जयशंकर मालिकेनंतर उमा न्यूझीलंडला स्थायिक झालेली आहे. अभिनय क्षेत्र सोडून ती आता स्वतःचे युट्युब चॅनल चालवत आहे. मेकअप टिप्स आणि मानसिक तणाव कसा घळवावा यांचे ती मार्गदर्शन करताना दिसत आहे. ऋषीकेश पेंढारकर न्यूझीलंडला स्थायिक आहे त्यामुळे अभिनय क्षेत्र सोडून उमाने तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
मन उधाण वाऱ्याचे, गडबड झाली, मोकळा श्वास अशा चित्रपट मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नेहा गद्रे सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. अश्विन बापट सोबत लग्न झाल्यानंतर तिने आपल्या घरसंसाराकडे लक्ष केंद्रित केले. गेल्याच वर्षी नेहाने ऑस्ट्रेलियात राहून शिक्षिकेची पदवी मिळवली होती. आता अभिनय क्षेत्राला रामराम ठोकून ती तिच्या या आवडत्या क्षेत्रात करिअर करताना दिसत आहे.
अभिनय क्षेत्र सोडून परदेशात स्थायिक झालेली चौथी अभिनेत्री आहे चैत्राली गोखले. आभाळमाया, इंद्रधनुष्य अशा मालिकांमधून चैत्रालीने अभिनय केला होता. मात्र या मोजक्या प्रोजेक्टनंतर चैत्राली लग्न करून टेक्सासला स्थायिक झाली. अर्थात अभिनय क्षेत्र तिने सोडलेले नसले तरी स्थानिक हौशी नाटकांमधून ती आपली अभिनयाची हौस पूर्ण करत आहे.
शुभंकरोती, असंभव, एका लग्नाची गोष्ट, साडे माडे तीन अशा चित्रपट मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली . सुजाता जोशी ही अभिनेत्री देखील आता अभिनय क्षेत्र सोडून परदेशात स्थायिक झाली आहे. लग्नानंतर सुजाता लंडनमध्ये तिच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे.