अवघ्या या २ महीन्यातच मालिकेने गुंडाळला गाशा… येत्या शनिवारी शेवटचा एपिसोड म्हणत प्रेक्षकांचा घेतला निरोप
मालिकेला टीआरपी मिळाला नाही तर त्या मालिका लवकरच संपवल्या जातात. अर्थात हे सर्व प्रेक्षकांवर अवलंबून असल्याने या निर्णयापुढे वाहिनीला हतबल व्हावे लागते. काही दिवसांपूर्वी मालिका लेखक अभिजित गुरू यानेही असेच भाष्य केले होते. प्रेक्षकांच्या हातात रिमोट आहे तुम्हाला मालिका आवडली नाही तर तुमचा टीव्ही बंद ठेऊ शकता अथवा चॅनल बदलू शकता. प्रेक्षकांनाही अभिजितचे हे म्हणणे पटले. प्रेक्षकांनी ठरवलं तर वर्षानुवर्षे मालिका चालत ठेवू शकता नाहीतर दोन काय एका महिन्यातच गाशा गुंडाळू शकता. काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीच्या हसताय ना हसायलाच पाहिजे या शोला काही दिवसातच गाशा गुंडाळावा लागला होता.
आता याच जोडीला कलर्स मराठीची एक मालिका अवघ्या २ महिन्यातच गाशा गुंडावण्यास सज्ज झाली आहे. “अंतरपाट” ही मालिका १० जून २०२४ पासून कलर्स मराठीवर प्रसारित होत होती. पण आता अवघ्या ७५ ते ७६ एपिसोड नंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे निश्चित केले आहे. अंतरपाट या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. रश्मी अनपट, अशोक ढगे, रेशम टिपणीस, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक असे बरेचसे कलाकार या मालिकेत दिसले होते. पण मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला थंड प्रतिसाद पाहून ही मालिका आटोपती घेण्यात आली आहे. शनिवारी या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलीकास्ट करण्यात आला होता.
तेव्हा मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला. या मालिकेच्या वेळेत दुर्गा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. आज २६ ऑगस्ट पासून दुर्गा ही मालिका रात्री ७.३० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे. अंबर गणपुळे आणि रुमानी खरे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर शिल्पा नवलकर, राजेंद्र शीसाटकर या कलाकारांची साथ त्यांना मिळणार आहे.