वर्षा उसगावकरनंतर या प्रसिद्ध गायकाची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री…त्याच्या गाण्याने अंबानीच्या लग्नात बॉलिवूड थिररकली

कलर्स मराठीवर येत्या २८ जुलै पासून बिग बॉस मराठीचा ५ वा सिजन टेलिकास्ट होत आहे. या शोमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची आतापासूनच उत्सुकता लागून राहिली आहे. मराठी बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आता रितेश देशमुख पेलताना दिसणार आहे. याअगोदर बिग बॉसचे चारही सिजन महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना ५ व्या सिजनचे होस्टिंग करता येणार नाही असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. दरम्यान चौथ्या सिजनमध्ये अनपेक्षित निकाल दिल्यामुळे महेश मांजरेकर ट्रोल झाले होते त्यामुळे या शोमधून त्यांनी काढता पाय घेतला का असेही बोलले जाऊ लागले. पण असे असले तरी रितेश देशमुखचेही प्रेक्षकांनी स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे

शोमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार हे त्याचं दिवशी जाहीर करण्यात येत असते याबद्दल अतिशय गुप्तता बाळगली जात असली तरी काही शोमध्ये सहभागी असलेल्या जवळच्या व्यक्तींकडून ही माहिती बाहेर येते. यात सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर आलेले पाहायला मिळाले, ते म्हणजे वर्षा उसगावकर. वर्षा उसगावकर यांनी चार वर्षे चालू असलेल्या स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला नुकताच निरोप दिला आहे. मालिका सोडण्यामागचे कारण त्यांनी दिले नसले तरी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठीच त्यांनी मालिका सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या रूपाने मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनचा पहिला सदस्य प्रेक्षकांसमोर आला आहे. तर दुसरा सदस्य हा एक प्रसिद्ध गायक, गीतकार असणार हेही आता स्पष्ट झाले आहे. १२ जुलै रोजी जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक मराठी सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते. या लग्नाच्या वरातीत एका मराठमोळ्या गायकाने गाणं गायलं होतं आता हाच गायक मराठी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सज्ज झालेला आहे.

हा तोच गायक आहे ज्याने गेल्या वर्षी सोशल मीडियावर गुलाबी साडीमुळे धुमाकूळ घातला होता. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल या गाण्यावर अवघा सोशल मीडिया स्टार रिल्स बनवू लागला होता. संजू राठोडने हे गाणं गाऊन सगळ्यांना थिरकायला लावले होते. आता हाच संजू बिग बॉसच्या घराचा सदस्य बनणार आहे. संजू राठोड गेली काही वर्षे त्याच्या सुरेल गाण्यांमुळे चर्चेत आला आहे. जळगावच्या या तरुणाला संगीताची विशेष आवड आहे. यातूनच त्याने काही गाणी प्रेक्षकांसमोर आणली होती, पण गुलाबी साडी मुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. वर्षभरात त्याच्या या गाण्याला जगभरात नावाजले गेले. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटरसुद्धा त्याच्या गाण्यावर रील बनवताना दिसले. याच प्रसिद्धीमुळे आता संजू राठोडला मराठी बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या घरात तो त्याचे अस्तित्व कसे सिद्ध करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.