लग्नाच्या अफवेमुळे तिचं करिअर संपले हे लक्षात येताच दादा कोंडके …हिंदी सृष्टीतून मराठीकडे वळलेल्या अभिनेत्रीचा खुलासा
दादा कोंडके चित्रपटात नेहमी खट्याळ भूमिकेत दिसले पण त्यापेक्षा त्यांचे वास्तव जीवन खूप वेगळे होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अडचणीत आलेल्या अनेक नायिकांना त्यांनी मदतीचा हात देऊ केला होता..दादा या नावाप्रमाणेच ते कोणाच्याही पाठीशी उभे राहत होते यात त्यांना मोलाची साथ होती ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची. अभिनेत्री मधू कांबिकर यांनाही अडचणीच्या काळात दादांनी मदत केली होती. तर काही हिंदी सृष्टीतील कलाकारांनाही दादांचा हा स्वभाव ठाऊक होता. त्याचमुळे प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांनीही दादांकडे मदतीचा हात मागितला होता. अरुणा इराणी या चित्रपटात नृत्यांगना म्हणून नावारूपाला आलेल्या होत्या.
त्याकाळात मेहमूद सोबत त्यांना अनेक चियरपटातून काम करण्याची संधी मिळाली होती. पण मेहमूद सोबत काम करत असतानाच त्यांच्यात जवळीक वाढू लागली आणि दोघांनी लग्नही केले अशी अफवा पसरवण्यात आली. खरं तर मेहमूद यांचे त्यावेळी लग्न झालेले होते. पण मेहमूद यांना याच अफवेमुळे खूप फायदा झाला होता. लग्नाच्या बातमीवर ते गप्प राहून होते त्यामुळे चित्रपटांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या होत्या. पण अरुणा इराणी यांच्याबाबतीत सगळेच फासे उलटे पडले. कारण या अफवेमुळे अरुणा यांना कोणीच काम द्यायला पुढे येत नव्हते. कुठलाच प्रोड्युसर त्यांना अशा परिस्थितीत साइन करायला तयार होत नसे. एकतर लग्नाच्या बातमीमुळे आपले नाव बदनाम झालेच शिवाय कोणी हातालाही काम देईना म्हणून अरुणा इराणी हतबल झाल्या. शेवटी दादा कोंडके यांच्याकडे त्यांनी ही परिस्थिती बोलून दाखवली.
आंधळा मारतोय डोळा या चित्रपटातील एका गाण्यात अरुणा इराणी यांना झळकण्याची संधी मिळाली. “दोन अडीच वर्षाच्या प्रयत्नानंतर दादांनीच मला पुन्हा एकदा पडद्यावर येण्याची संधी उपलब्ध करून दिली”, असे अरुणा इराणी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. दादांचा हात पाठीशी होता त्यामुळे मी अभिनय क्षेत्रात पुनःपदार्पण करू शकले असे त्या बिनधास्तपणे सांगतात. त्यानंतर अरुणा इराणी यांनी मराठी सृष्टीत अनेक कगीतरपटातून काम केले. लपवा छपवी, चंगु मंगु, भिंगरी, एक गाडी बाकी अनाडी, मितवा अशा चित्रपटात अरुणा इराणी महत्वपूर्ण भूमिकेत झळकल्या आहेत.