खऱ्या आयुष्यातही मी सिंगल मदर… ती जेव्हा ३ साडेतीन वर्षांची होती तेव्हा माझ्या नवऱ्याला देवाज्ञा झाली त्या काळात

अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी म्हणून सुरेखा कुडची यांना ओळखलं जात. अनेक मराठी चित्रपट, नाटके तसेच मालिकांत त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. सध्या सन मराठीवर ‘जुळली गाठ गं’ या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे सध्या त्या चांगल्याच चर्चेत आहेत. नुकतीच त्यांनी त्याच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्या म्हणतात “मी मालिकेतही सिंगल मदर आहे आणि खऱ्या आयुष्यातही सिंगल मदर आहे. माझी मुलगी १० वीला आहे, पण कामामुळे मला तिला कधीच वेळ देता आला नाही.

ती जेव्हा तीन साडेतीन वर्षांची होती तेव्हाच माझ्या नवऱ्याला देवाज्ञा झाली. कामामुळे मी महिन्याचे २०-२५ दिवस घराबाहेरच असते. या काळात माझ्या मुलीचा सांभाळ आईवडिलांनी केला. मला टिव्हीवर पाहूनच ती मोठी झाली. सिंगल मदर म्हणून मुलांचं संगोपन करताना खूप जबाबदारी असते, या काळात तुमच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा सपोर्ट असावा लागतो. आज बऱ्याच जणी सिंगल मदरची जबाबदारी पार पाडत आहेत. सन मराठीवर ‘जुळली गाठ गं’ या मालिकेतील माझी भूमिका अशीच आहे. ती खलनायिका जरी असली तरी तिचं तिच्या मुलावर तेवढंच प्रेम आहे.

या मालिकेमुळे आम्ही कोल्हापूर येथे शूटिंग करत आहोत त्यामुळे मुलीपासून खूप दूर राहावं लागतंय. पण जेव्हा मी तिच्याजवळ असते तेव्हा मी तिला कायम बिलगून राहते.” अभिनेत्री सुरेखा कुडची या गेली अनेक वर्षे खऱ्या आयुष्यात सिंगल पॅरेन्टची भूमिका निभावत आहेत. मालिकेच्या निमित्ताने त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.