घरच्यांचा खूप राग यायचा… ११ वर्षाने मोठा असलेला मुलासोबत पळून जाऊन बॉयफ्रेंडच्या घरी राहू लागली पण
अंकिता वालावलकर ही सोशल मीडिया स्टार आहे. इन्फ्लुएन्सर म्हणून तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या प्रमोशनसाठी विचारणा केली जाते. अस्सल कोकणी भाषेतील तिचे व्हिडीओ चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. मात्र ही कोकण हार्टेड गर्ल कधी काळी डिप्रेशन मध्ये गेली होती असा धक्कादायक खुलासा तिने नुकताच केलेला पाहायला मिळतो आहे. अंकिता वालावलकर ही कोकणची. घरी अत्यंत शिस्तीचे वातावरण असल्याने पहाटे ५ वाजता उठून अभ्यास करणे हे तिचे नित्याचे ठरलेले असायचे. अंकिता शालेय शिक्षणात अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. अगदी सुरुवातीपासूनच ती पहिला नंबर पटकवायची. पण या शिस्तीचा तिला खूप कंटाळा यायचा. तिला अभ्यास करायला मुळीच आवडत नसायचं. कधीतरी आई एखादी कॅडबरी घेऊन द्यायची पण बाबांकडे असले लाड मुळीच चालत नसायचे. पण तिच्या ओळखीतला आणि तिच्यापेक्षा ११ वर्षाने मोठा असलेला एक मुलगा तिला आवडू लागला.
कारण तो मुलगा तिला चॉकलेट घेऊन द्यायचा कधीकधी तर चित्रपट पाहायला सुद्धा घेऊन जायचा. त्याचं आपल्यासाठी हे करणं तिला आवडू लागलं होतं. त्यामुळे घरचे तिला त्रासदायक वाटू लागले. एक दिवस वैतागून तिने तिच्या आई बाबांना ‘ तुम्ही माझ्यासाठी काय केलं?’ असा थेट प्रश्नच विचारला. त्यानंतर एक क्षण असा आला की तीला घरच्यांचा राग येऊ लागला. तेव्हा अंकिता थेट त्या मुलाकडे गेली आणि आपण लग्न करू असे म्हणाली. त्याचवेळी भावाच्या एक्स गर्लफ्रेंडने सगळ्यांना फोन करून अंकिताने पळून जाऊन लग्न केले अशी अफवा पसरवली. तेव्हा आता आपलं काही खरं नाही आई आपल्याला शोधायला नक्की येणार म्हणून ती त्या मुलाच्या घरी राहायला गेली. आता आपण १८ वर्षांचे झाले आहोत त्यामुळे आपल्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे ती म्हणाली. पण एक दीड महिन्यातच तिला त्या मुलाचं प्रेम कळू लागलं. तो मुलगा मुंबईला कामाला होता त्यामुळे त्याला तिकडे जाणं भाग होतं. पण अंकिता त्या मुलाच्याच घरी राहू लागली. त्या मुलाची आई माझी सासू जरी नसली तरी त्या एका आईप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या असे अंकिता म्हणते. त्यांनीच अंकिताला तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. यादरम्यान अंकिताचे त्या मुलासोबत अनेकदा भांडणं झाली, कधी अंकिता तर कधी तो दोघेही एकमेकांवर राग व्यक्त करू लागले. त्यादरम्यान अंकिताला घरच्यांची आठवण येऊ लागली. पुन्हा आपल्या घरी जावं असे विचार मनात आले. मात्र आईवडील आपल्याला घरात घेतील की नाही? असा प्रश्न तिला सतावत होता. शिवाय आजूबाजूला तिच्याबद्दल अनेक गोष्टी पसरवण्यात आल्या ती चार लोकं आपल्याला काय म्हणतील असे विचार मनात आले. तो मुलगा आता सुधारेल नंतर सुधारेल असे करत दोन वर्षे तिने त्याच्या सुधारण्याची वाट पाहिली.
इंजिनिअरिंगला चांगले मार्क्स मिळत नसल्याने आणि बॉयफ्रेंड आपले मानसिक खच्चीकरण करतोय हे पाहून अंकिता डिप्रेशनमध्ये गेली. सततची भांडणं, मार खाणं, तू काहीच करू शकणार नाहीस, भांडे घासायची लायकी आहे तुझी असे टोमणे तिला ऐकावे लागले. त्या क्षणानंतर अंकिताने पुन्हा आपल्या आईवडिलांकडे परतण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिला आईवडील आपलेसे वाटू लागले. आई वडिलांनी अंकिताला एक विचार करण्याची संधी दिली आणि तू जो निर्णय घेशील तो शेवटचा असेल असे म्हणत तिला पुन्हा घरात घेतले. यानंतर मात्र अंकिता स्वतःच्या पायावर उभी राहिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चांगली प्रसिद्धी मिळवत आहे पण काही लोक “गडे मुर्दे फीरसे उखाडते है” असे म्हणत आपल्या आधीच्या चुका उघड करण्याचा घाट घालतात. तेव्हा अंकिताने स्वतःच आपल्या पूर्वायुष्याच्या चुकांचा उलगडा एका व्हिडिओतून केला होता. तिची ही स्टोरी पाहून अनेकांना तिचं कुतूहल वाटलं. एका मुलीने अशीच चूक केली होती अंकिताचा हा व्हिडीओ तिने पाहिला तेव्हा ती मुलगी ढसाढसा रडू लागली. प्रेम चुकीचं नसतं पण आपण कोणाच्या प्रेमात पडतोय हे महत्त्वाचं असतं असे अंकिता म्हणते.