
स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दरवेळी नवनवीन ट्विस्ट घडवून आणत आहे. जानकी आणि हृषीकेश यांना होत असलेला त्रास प्रेक्षकांना सहन होत नाही मात्र ऐश्वर्याचं कट कारस्थान लवकरच सर्वांसमोर उघड व्हावं अशी प्रेक्षकांची मनापासून ईच्छा आहे. एकीकडे जानकी वरची संकटं कमी होत असतानाच मालिकेत एक मोठा बदल घडून येणार आहे. विक्रांतची भूमिका आजवर अभिनेता अक्षय वाघमारे याने साकारली होती मात्र आता अक्षय वाघमारे याने ही मालिका सोडल्याचे निश्चित झाले आहे.
लोकप्रिय अभिनेता अक्षय वाघमारे हा डॅडी म्हणजेच अरुण गवळींचा जावई आहे. त्याच्या पत्नीचं नाव योगिता गवळी-वाघमारे असं आहे. अक्षयने यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कामं केलेली आहेत. एका नवीन प्रोजेक्ट निमित्त अक्षय ही मालिका सोडतोय असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता विक्रांतची भूमिका यापुढे अभिनेता सोहन नांदूर्डीकर साकारताना दिसणार आहे. सोहन नांदूर्डीकर याने मन धागा धागा जोडते नवा मालिकेत केदारचे पात्र साकारले होते. जे पात्र काहीसे नकारात्मक होते.

आताही त्याची ही भूमिका नकारात्मक असल्याने या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून सोहन नांदूर्डीकर प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. लेक माझी दुर्गा, लक्ष्मी नारायण, We2 अशा चित्रपट, मालिकेत तो महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला आहे. त्यामुळे प्रेक्षक त्याला विक्रांतच्या भूमिकेत नक्कीच स्वीकारतील असा विश्वास आहे.