अजित पवारने माझा कारखाना विकला आणि बोगस नावाने स्वतःच …ज्याची किंमत १००० कोटी होती तो फक्त ७५ लाखात
डॉ शालिनीताई पाटील यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अजित पवारांवर बिनधोकपणे आरोप लावलेले आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं की, ‘ शरद पवार यांनी त्यांच्या वयाच्या ३८ व्या वर्षी पक्षातून बाजूला होण्याची भूमिका घेतली होती मी वयाच्या ६० व्या वर्षी घेतली.’ यावर शालीताई स्पष्ट म्हणतात की शरद पवार यांनी घेतलेली भूमिका ही वेगळी होती. पण अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या नावाने निवडून आले आहेत आणि त्यांनी आपलाच पक्ष संपवावा अशी भाजपा कडून सुपारी घेतली आहे. शरद पवारांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही असे शालिनीताईंचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी शिखर बँकेचाही मुद्दा काढला. “शिखर बँकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. अजित पवारांनी छोट्या छोट्या कारणासाठी ४५ कारखाने विकले आणि साखर उद्योगाची चळवळ मारून टाकली त्यात माझाही कारखाना होता.
वैकुंठभाई मेहता, पद्मश्री विखेपाटील, बॅरिस्टर गाडगीळ आणि वसंतदादा पाटील अशा आम्ही चार पिढ्यांनी ही शिखर बँक मोठ्या प्रयत्नाने उभी केली होती. शिखर बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आणि तो अजित पवारांनी केला. मी त्याविरोधात कोर्टात केस दाखल केली. ऑगस्ट २०१९ मध्ये त्याचा निकाल आला. त्यानंतर मी एफआयआर दाखल केली तेंव्हा चार दिवसात आरोपीला चार्जशीट द्यावी लागते तसे घडले नसल्याने मी आता येत्या काही दिवसात या मुद्द्याचा पाठपुरावा करणार आहे. मी अखेरपर्यंत हा लढा देत राहणार आहे. अजित पवारने माझा कारखाना विकला. ४५ पैकी १३ कारखाने त्याने एकट्याने विकत घेतले बोगस कंपन्या काढून. माझ्या कारखान्याचा लिलाव करून तो ५७ लाखाला विकत घेतला. त्यावेळी त्याची किंमत १ हजार कोटी रुपये इतकी होती. यात कारखान्याची जमीन, मशिनरी यांचा समावेश होता. आता त्याची किंमत कित्येक पटीने वाढली. ज्याने एवढा मोठा घोटाळा केला त्यानेच माझा कारखाना ताब्यात घेतला म्हणून मी तक्रार दाखल केली.
तेव्हा हा कारखाना ईडीने ताब्यात घेतला. ईडीने कारखाना ताब्यात घेतल्यानंतर मी तो पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा ईडीने १४ हजार मेजोरीटी असलेल्या सभासदांच्या सह्या दाखल करण्यास सांगितल्या. माझे २५ हजार सभासद आहेत त्यातील १४ हजार सभासदांच्या सह्या दाखल करून एक वर्ष झाले. अजूनही त्यावर निर्णय देण्यात आलेला नाही. ” शालिनीताई ९२ वर्षांच्या आहेत. त्यांना एक लाखाहून अधिक पेन्शन मिळते. ही पेन्शन मिळवण्यासाठी मी जिवंत आहे की नाही याची चौकशी केली जाते. माझे डोळे, कान व्यवस्थित काम करतात. चष्म्याशिवाय मी या वयातही सही करू शकते. फक्त अपघातात माझा एक पाय अधू झाला आहे. त्यासाठी दिवसभर मला एक मदतनीस लागते. पण काम करण्याचा उत्साह तेवढाच दांडगा आहे. आता मी लवकरच माझ्या कारखान्याच्या साईटवर चेअरमन बंगला आहे तिथे जाऊन राहण्याची माझी इच्छा आहे असे शालिनीताई पाटील सांगतात.