अविनाश ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना…गर्लफ्रेंडसाठी लिहिलेल्या खास पोस्टने वेधलं लक्ष
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय नारकर हा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला चालला आहे. त्यामुळे अविनाश नारकर यांनी लेकाला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहे. आता काही वर्षे पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जात असल्याने अमेय भावुक झालेला पहायला मिळतो आहे. मित्रांसोबतच्या जून्या आठवणी त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.’मुंबई-पुणे-सातारा -ऑस्ट्रेलिया- अमेरिका , हो जायेगा’ असे म्हणत अमेयने आपल्या या प्रवासाचा आढावा दिला आहे. यादरम्यान अमेयने गर्लफ्रेंडसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे जी लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
आता काही वर्षे आपली भेट होणार नाही या अनुषंगाने अमेय ईशाला ‘खूप मिस करणार’ असल्याचे म्हणतो आहे. ईशा संजय ही अभिनेत्री असून सध्या ती झी मराठीच्या लाखात एक आमचा दादा मालिकेत सूर्याच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. अमेय हा रुईया कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकाशी जोडला गेला. अभिनय, नाटकाचे दिग्दर्शन तो करू लागला. इथेच त्याची ओळख ईशा सोबत झाली. हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ईशा आणि अमेय दोघांनाही अभिनयाची आवड आहे. खरा इन्स्पेक्टर मागावर आहे या नाटकाचे अमेयने दिग्दर्शन केले आहे.
तर ईशाने ललीतकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. तिला नृत्याची देखील विशेष आवड आहे. ईशा जेव्हा मालिकासृष्टीत पदार्पण करणार होती तेव्हाही अमेयने तिच्यासाठी शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती. अमेय सध्या त्याच्या पुढील शिक्षणाच्या तयारीला लागला आहे. यासाठी तो अमेरिकेला रवाना झाला आहे. त्यामुळे सगळ्यांना निरोप देताना तो खूप भावूक झालेला पाहायला मिळतो आहे.