news

अगबाई अरेच्चा चित्रपटातील ही बालकलाकार २० वर्षाने दिसते खूपच सुंदर …आजही मराठी मालिकेत करते काम

केदार शिंदे दिग्दर्शित अगंबाई अरेच्चा! या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवलेली पाहायला मिळते. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रथमच साताऱ्यातील बावधन गावच्या बगाड यात्रेचे चित्रीकरण दाखवण्यात आले होते. मन उधाण वाऱ्याचे, उधे गं अंबे उधे, चम चम करता अशी सुरेल गाणी या चित्रपटाला लाभली होती. बायकांच्या मनात बोललेलं रंगाला सर्वकाही ऐकू येतं आणि यातूनच जी धमाल उडते ती या चित्रपटात दाखण्यात आली आहे. या चित्रपटातुनच तेजस्विनी पंडित हिचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले होते तर केदार शिंदे यांची मुलगी सना हिनेही बालकलाकार म्हणून या चित्रपटातून पदार्पण झालेले पाहायला मिळाले. एवढंच नाही तर चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक केदार वैद्य आणि अभिनेत्री पल्लवी वैद्य यांची लव्हस्टोरी याच चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेली होती. या आणि अशा कितीतरी गोष्टी या चित्रपटाच्या बाबतीत तुम्ही ऐकल्या असतील.

aggabai arecha actress aishwarya patil
aggabai arecha actress aishwarya patil

पण आता या चित्रपटात झळकलेल्या बालकलाकार ‘रमा’ बद्दल पहिल्यांदाच उलगडा होणार आहे. कारण ही बालकलाकार आता मराठी चित्रपट, मालिकेतून अभिनेत्री म्हणून परिचयाची बनलेली आहे. चित्रपटाचा नायक रंगा जिथे काम करतो तिथे ही रमा मुलगा (रामू) बनून चहा देण्याचे काम करत असते. पण रंगाला मुली, महिलांच्या मनातलं ऐकायला येत असल्याने रामू मुलगा नसून मुलगी आहे हे त्याच्या लक्षात येते. आपल्याला कामावरून काढून टाकू नये म्हणून ही रमा रामू बनून पडेल ते काम करते. ही रमाची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या पाटील हिने साकारलेली आहे. ऐश्वर्या पाटील ही आता अभिनेत्री असून ती मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवताना दिसत आहे. नुकत्याच निरोप दिलेल्या माझी माणसं या सन मराठीवरील मालिकेत ऐश्वर्याने गिरीजाची भूमिका साकारली होती.

aishwarya patil marathi actress
aishwarya patil marathi actress

याशिवाय यंटम चित्रपट, पंजाबी ड्रेस ही शॉर्टफिल्म आणि जाऊ द्या ना भाई सारख्या काही नाटकातून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. ऐश्वर्या ही मूळची रत्नागिरीची. गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये असताना तिने नाटकातून सहभाग दर्शवला होता. फिल्म एडिटर साई मचकर सोबत ऐश्वर्याने लग्नगाठ बांधलेली आहे… जुन्या नव्या मराठी चित्रपटातील मालिकांतील कलाकारांच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी पेजला जॉईन व्हा आणि तुम्हाला हव्या असलेल्या कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्हाला कमेंट करा आम्ही जास्तीतजास्त माहिती पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button