
काहीच दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवरील आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतून अभिनेता आदिश वैद्य याने एक्झिट घेतली होती. सेल्फ रिस्पेक्ट या कारणास्तव आदिशने ही मालिका सोडत असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान या मालिकेनंतर आदिश हिंदी मालिकेत झळकणार असे बोलले जात होते. मात्र या गोष्टीत काहीच तथ्य नसल्याचे त्याने स्पष्टीकरण दिले. खरं तर सेटवर बिनसल्यामुळे आदिशने ही मालिका सोडल्याचे त्याच्या स्पष्टीकरणावरूनच समजले. त्यामुळे अचानक मालिकेतून एक्झिट घेतल्याने मकरंद किल्लेकर हे पात्र मालिकेतून गायब होणार का? असे बोलले जाऊ लागले.

पण आता या भूमिकेसाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे. मकरंद किल्लेकर हे मालिकेचे पात्र काहीसे विरोधी आहे त्यामुळे आदिशने साकारलेले हे पात्र निभावण्यासाठी तेवढ्याच दमदार नायकाची आवश्यकता होती. त्याचमुळे आता ही भूमिका अभिनेता अमित रेखी साकारताना दिसणार आहे. या मालिकेतून अमित रेखिला पुन्हा एकदा निवेदिता सराफ यांच्यासोबत झळकण्याची संधी मिळणार आहे. कारण याअगोदर तो भाग्य दिले तू मला या मालिकेत त्यांच्यासोबत काम करताना दिसला होता.

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अमित मालिका, चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे. माज, तुझं माझं जमतंय , भाग्य दिले तू मला यानंतर तो पुन्हा एकदा आई बाबा रिटायर होत आहेत मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अर्थात निवेदिता सराफ यांच्यासोबत विरोधी भूमिका साकारण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. आजपासून अमित या मालिकेत मकरंदचे पात्र साकारत आहे त्यामुळे मालिकेला पुन्हा एकदा झळाळी मिळाली आहे.