आदेश बांदेकर यांनी त्यांच्या सुत्रसंचालनाने गाजवलेला ‘होमिनिस्टर’ हा शो प्रेक्षकांच्या मनात आजही आठवणी जपून ठेवून आहे. या शोने २० वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले पाहायला मिळाले होते. पण सप्टेंबर महिन्यात या शोने तात्पुरता ब्रेक घेण्याचे निश्चित केले. पण यामुळे तमाम गृहिणी, शोच्या चाहत्यानी होम मिनिस्टर पुन्हा सुरू करावा अशी मागणी केली. मनोरंजनाचे माध्यम म्हणून नाही तर ते एक महिलांना व्यक्त होण्यासाठीचे एक माध्यम होते त्यामुळे हा शो पुन्हा सुरू व्हावा अशी ईच्छा व्यक्त केली गेली. होम मिनिस्टर कधी सुरू होणार? तुम्ही आमच्या घरी कधी येणार? असे असंख्य प्रश्न आदेश भावोजींना विचारले जात आहेत.
नुकतेच या प्रश्नाचे उत्तर आदेश भावोजींनी दिलेले पाहायला मिळत आहे. “हा शो पुन्हा सुरू व्हावा याचा विचार माझ्या मनात सुरू आहे. त्यासाठीची जुळवाजुळव देखील चालू आहे.” अशी एक हिंट त्यांनी जागतिक दूरचित्रवाणी दिनाच्या दिवशी चाहत्यांना दिली आहे. आदेश बांदेकर सध्या त्यांच्या लाईव्ह शो निमित्त परदेश दौऱ्यावर आहेत. होम मिनिस्टर हा शो सप्टेंबर २००४ मध्ये पहिल्यांदा झी मराठीवर प्रसारित झाला होता. मधल्या काळात या शो मध्ये बदल घडून आले. काही काळ निलेश साबळे ने या शो चे सूत्रसंचालन केले होते. पण आदेश भावोजी यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना विशेष भवले होते. त्यामुळे हा बदल प्रेक्षकांना रुचला नाही.
पुढे स्पॉन्सर्स म्हणून तथास्तु पैठणीने काढता पाय घेतला. अनेक महा मेपिसोड्स रंगलेले पाहायला मिळाले. सेलिब्रिटींनाही शो मध्ये आमंत्रित केले. त्यामुळे या शोने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. हा शो संपल्यानंतर त्यांना अनेक वहिनींकडून पत्र, मेसेजसे मिळत आहेत की, शो कधी सुरू करणार. या सगळ्यांचा विचार करूनच आदेश भावोजी पुन्हा हा शो सुरू करणार असल्याचे स्पष्ट करतात. पण त्याचे स्वरूप नेमके काय असणार आणि ते प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.