सुप्रिया पाठारे यांनी दिली सेलिब्रिटी चायवाले अँड स्नॅक्स कॉर्नरला भेट… घरगुती इडली डोसा आणि चहाचा लुटला आनंद
सिनेसृष्टीतील करिअर म्हणजे खूप पैसा असेल असा आपला समज असतो. परंतु या क्षेत्रातील कलाकारांना अनेकदा आर्थिक समस्यांना तोडं द्यावं लागतं. मालिकेतील कलाकार दिवसातील रोज दहा-बारा तास चित्रीकरण करतात. इतके तास काम करूनही कलाकारांना मानधन मात्र तीन महिन्यांनी मिळतं. अनेकदा तीन महिने उलटूनही पैसे मिळत नाहीत. हाच मुद्दा अनेकदा यापूर्वी चर्चेत आलाय.साहजिकच जेव्हा कलाकारांसमोर आर्थिक प्रश्न उभा राहतो तेव्हा त्यांना अन्य काहीतरी मार्गाने अर्थाजनाचे पर्याय शोधावे लागतात. त्यात जर संकट पोटच्या मुलाच्या आजाराचं असेल तर असा कलाकार बाप काय करू शकतो हे दाखवून दिलं आहे अभिनेता अतुल वीरकर याने. मुलगा प्रियांशच्या दुर्धर आजारावरील उपचारासाठी पैसा जमवण्याकरीता अभिनयासोबत अतुलने चहा नाष्ट्याची व्हॅन सुरू केली आहे. सध्या तो शूटिंग आणि फूड व्हॅन सांभाळत मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवत आहे.
कलाकारांना त्यांच्या कामाचं मानधन लवकर मिळत नाही. या मुद्द्यावर अनेक दिग्गज कलाकारांनी भाष्य केलंय. परंतु आजही हा प्रश्न सुटलेला नाही. यामुळं सर्वात जास्त हाल होतात ते दुय्यम फळीत काम करणाऱ्या कलाकारांचे. काम आणि मानधनाची अनिश्चितता यामुळं त्यांच्या कुटुंबांचेही आर्थिक हाल होत असल्याचं चित्र आहे. असं असलं तरी कलाकार कधीही हार मानत नाहीत. अनेक कलाकारा सध्या विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. कुणी भाजीचा व्यवसाय करतोय, कुणी रिक्षा चालवतोय. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या अतुल विरकर यांनीही मागील वर्ष पासून स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये पत्नीच्या साथीने अतुलने ठाण्यातील पोखरण रोडवरील बेथनी हॉस्पिटलसमोर सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच यावेळेत ही फूड व्हॅन सुरू असते. अतुल वीरकर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत अभिनय करताना दिसला होता. त्यानंतर त्याने बऱ्याच मालिकेत कामे केली. काल अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी अतुलच्या फूड व्हॅनला भेट दिली. त्यावर अतुल म्हणतात ” काल माझ्या फूडव्ह्यान सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि माझ्या मार्गदर्शक आणि ज्यांचा सोबत मी मालिकामधून काम केली… अशा सर्वांचा लाडक्या सुप्रिया (ताई )पाठारे आणि त्त्यांची फॅमिली यांनी भेट दिली… आणि त्यानी घरगुती इडली चटणी आणि डोसा चटणी खाऊन मनसोक्त नाश्ता केला….आणि शुभेच्छा ही दिल्या… थँक्यू सुप्रिया ताई..”