news

आई हया वयात आणि हया टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत आणि खूप guts लागतात म्हणत प्रसिद्ध अभिनेत्रीने आईला दिल्या शुभेच्छा

काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर यांचा दुसरा विवाह थाटात पार पडला होता. सिध्दार्थने या वयात एकाकी राहत असलेल्या आईचे दुसरे लग्न लावून दिले म्हणून सर्वांनीच त्याचे मोठे कौतुक केले. सिद्धार्थ लहान असतानाच त्याचे आईवडील वेगळे झाले होते. आई सीमा चांदेकर यांनी सिद्धार्थ आणि त्याच्या बहिणीचे एकटीने पालनपोषण केले. दोघेही मुलं आपापल्या संसारात रमली त्यामुळे त्याच्या आईला एकटे वाटू लागले. तिचा एकटेपणा घालवण्यासाठी चांदेकर कुटुंबियांनी आईचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता. असाच काहीसा विचार आणखी एका मराठी अभिनेत्रीने घेतलेला पाहायला मिळाला. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून निरोप घेतला. या मालिकेत मानसी कानिटकर हे पात्र साकारणाऱ्या अमृता फडके हिच्या आईचा नुकताच दुसरा लग्नसोहळा पार पडला.

actress amruta phadke with mother
actress amruta phadke with mother

काल शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी अमृताने तिच्या आईचे दुसरे लग्न अगदी थाटात लावून दिले. बाबा म्हणायला आता आपल्याला हक्काची व्यक्ती मिळलीये हे पाहून आणि आई हे लग्न करून खुश असल्याचे पाहून अमृताने तिच्या या नवीन नात्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. अर्थात अमृताने एकाकी असलेल्या आईचे पुन्हा लग्न लावून दिल्याने तीही खूप खुश असलेली पाहायला मिळाली. याबद्दल अमृता म्हणते की, ” आई…., अभिनंदन ८.१२.२०२३ तुझ्या नविन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा …उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, असावा, सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा असते. पण तस वाटणं, तसं मिळणं आणि घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतच असं नाही. पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळतीये. आणि तेही तुझ्या 2nd inning च्या टप्प्यावर! खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासूनची इच्छा होती. आणि माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्प नव्हत, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भवनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे.

amruta phadke mother wedding photo
amruta phadke mother wedding photo

तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळालीये. मनानी खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठया कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झालीये. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. त्यासाठी a big thank you . आई, हया वयात, आणि हया टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत आणि खूप guts लागतात. त्यासाठी खरतर दोघांनाही hats off तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना Lods of love, stay always healthy happy & blessed!!” अमृता फडके ही बालपणापासूनच मालिका, नाटकातून काम करत होती. यासाठी तिच्या आईकडून तिला मोठा पाठिंबा मिळत गेला. छोट्या रमाच्या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली होती. झी मराठीवरील ‘ महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून ती प्रकाशझोतात आली होती. श्री गुरुदेवदत्त, गर्ल्स हॉस्टेल, आर्या अशा चित्रपट मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. आईच्या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून अमृताच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button