serials

हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये झळकणार ही प्रसिद्ध अभिनेत्री… लग्नानंतर वर्षभरात मिळाला मोठा ब्रेक

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल दहा वर्षांच्या सहवासानंतर या कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग तयार झाले होते. पण आता शोमधील हेच कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीने नुकत्याच एका नवीन शोची घोषणा केली. ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ ही चला हवा येऊ द्या ची टॅग लाईन घेऊन केदार शिंदे कलर्स मराठीवर हा शो आणत आहे. महत्वाचं म्हणजे या शोमध्ये निलेश साबळे पुन्हा एकदा जबाबदारीचं ओझं स्वतःच्या खांद्यावर पेलणार आहे. त्यात त्याला भाऊ कदम आणि ओंकार भोजने या हरहुन्नरी कलाकारांची साथ मिळणार आहे.

hastay na hasaylach pahije actress
hastay na hasaylach pahije actress

चला हवा येऊ द्या मधील आणखी काही कलाकार मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे या शोचा भाग बनणार आहेत. मिसेस मुख्यमंत्री मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला रोहित राऊत चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांना हसवताना दिसला. त्यामुळे तोही आता हसताय ना, या शोचा भाग बनणार आहे. स्नेहल शिदमने तर चला हवा येऊ द्या चा शो जिंकला होता .त्यानंतर ती या शोमध्ये पाय घट्ट रोवून बसलेली पाहायला मिळाली होती. अर्थात तिच्या टॅलेंटमुळेच प्रेक्षकांनी तिच्या विनोदी अभिनयाला स्वीकारलं होतं त्यामुळे तिचं मोठं कौतुक देखील झालेलं पाहायला मिळालं. म्हणूनच स्नेहल देखील आता हसताय ना मध्ये प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. गेल्याच वर्षी अभिनेत्री सुपर्णा श्याम हिने संकेत पाठक सोबत लग्न केले होते. लग्नानंतर वर्षभरातच सुपर्णाला मोठा ब्रेक मिळाला आहे.

actress superna shyam in hastay na hasaylach pahije
actress superna shyam in hastay na hasaylach pahije

कारण आता ती हसताय ना हसायलाच पाहिजे या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. बंध रेशमाचे, माझिया प्रियाला प्रीत कळेना, दुहेरी अशा मालिकेतून सुपर्णाला महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. पण गेल्या काही वर्षात सुपरणाकडे कुठलेच काम नव्हते. पण आता संकेत सोबत लग्नानंतर जवळपास एक वर्षाने तिला अभिनयाची मोठी संधी मिळत आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमधून सुरू झालेला सुपर्णाचा अभिनय क्षेत्रातील प्रवास आता तिला हसताय ना हसायलाच पाहिजे मध्ये घेऊन आलेला आहे. याअगोदर तिने विरोधी भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती पण आता विनोदी अभिनयाने ती प्रेक्षकांची मनं कशी जिंकणार याची अधिक उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button