news

लैगिंक अत्याचार आणि फसवणुकीच्या धक्कादायक तक्रारीनंतर अभिनेत्रीची तब्येत खालावली

गेल्या वर्षी खान्देशातील “झुमकावाली पोर” हे गाणं सोशल मीडियावर खूपच गाजलं होतं. या गाण्याला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली होती. विनोद कुमावत याने हे गाणं लिहिलं होतं आणि या गाण्यात त्याने प्रमुख भूमिका देखील साकारली होती. याच गाण्याची नायिका म्हणजे राणी कुमावत हिची तब्येत आज अचानक खालावली असल्याचे समोर आले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राणी कुमावत हिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राणी कुमावत सोशल मिडियापासून देखील दूर होती. त्यामुळे खान्देशातील तिचे चाहते तिच्या प्रकृतीबाबत चौकशी करू लागले. उपचारानंतर राणी कुमावत लवकरच चाहत्यांसमोर येईल असा विश्वास तिच्या आईवडिलांनी व्यक्त केला आहे.

rani kumavat in hospital
rani kumavat in hospital

राणी कुमावत आणि विनोद कुमावत यांना झुमका वाली पोर या गाण्यामुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. वेगवेगळ्या इव्हेंटसाठी त्या दोघांनाही आमंत्रित केले जात होते. मात्र गेल्याच महिन्यात राणी कुमावत हिने विनोद विरोधात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपासून विनोद कुमावत आणि राणी कुमावत यांच्यात वैयक्तिक वाद झाले होते. या दोघांनी एकत्रितपणे अनेक गाण्यातून काम केले होते, दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. राणी कुमावत ही सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ अपलोड करत असे. विनोद कुमावत या कलाकाराला त्याच्या गाण्यासाठी नायिकेची गरज होती. त्यामुळे त्याने राणी कुमावत हिच्याशी संपर्क साधला. दोघांनी गाण्यातून एकत्रित काम केल्यानंतर या दोघांची ओळख वाढू लागली. याचाच गैर फायदा घेऊन विनोद कुमावतने राणी कुमावत सोबत शारीरिक जवळीक वाढवली. विनोद आपल्याशी लग्न करेल म्हणून तिने ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली होती.

actress rani kumavat
actress rani kumavat

मात्र विनोद कुमावत अगोदरच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे हे समजताच राणीने त्याच्याजवळ चौकशी केली. तेव्हा विनोदने आपल्याला मारहाण केली, लैंगिक अत्याचार केले आणि आपली फसवणूक केली अशी तक्रार राणी कुमावत हिने काही दिवसांपूर्वीच नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर विनोद कुमावत याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण चौकशीअंती पोलिसांनी विनोद कुमावत निर्दोष असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणानंतर आता अभिनेत्री राणी कुमावत हिची तब्येत खालावली आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून तिचे चाहते काळजी करत आहेत. पण योग्य उपचारानंतर राणी कुमावत लवकरच चाहत्यांसमोर येईल असा विश्वास तिच्या आई वडिलांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button