प्राजक्ता माळी तिच्या निस्सीम सौंदर्याने तरुणांना भुरळ घालतेच पण तिच्या दिलखुलास हास्याचेही अनेजण चाहते आहेत. एक यशस्वी अभिनेत्री अशी तिने मराठी इंडस्ट्रीत ओळख बनवली आहे. कारण दोन तीन महिन्यात ती कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळतेच. लवकरच तिचा प्रमुख भूमिका असलेला ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या नावातच गंमत आहे त्यामुळे हा चित्रपट रोमॅंटिन कॉमेडीचा संगम असणार आहे. प्राजक्ता मीडियामाध्यमांशी नेहमीच संवाद साधत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या बालपणीच्या काही गमतीजमती उलगडल्या आहेत. प्राजक्ता बालपणापासूनच नृत्याचे धडे गिरवत होती. आपल्याला याच क्षेत्रात करिअर करायचं असा ठाम निर्णय तिने घेतलेला होता.
शाळेत असतानाही ती सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायची. एकदा तिने अकरा ते बारा मिनिटांचे सादरीकरण केले होते. अर्थात या नृत्याचे दिग्दर्शन तिनेच केले होते. या अकरा मिनिटांमध्ये तिला तीनदा साड्या बदलाव्या लागल्या होत्या. देवदास या चित्रपटातील काही गाण्यांवर तिने हे नृत्य केले होते तेव्हा तिला शाळेतली मुलं ‘ए पारो’ म्हणून हाक मारू लागले. आपण प्रसिद्ध होतोय ही गोष्ट प्राजक्ताला सुखावणारी ठरली. दहावीत असताना प्राजक्ताने बंड पुकारले होते. खरं तर मी खूप गुणी मुलगी आहे, आईवडिलांच सगळं काही ऐकणारी मुलगी होते असं प्राजक्ता म्हणते, पण तिने हे बंड का पुकारले यालाही एक कारण होते. दहावीत असताना प्राजक्ताला चांगले गुण मिळाले. डिस्टिंशन मिळाल्यानंतर प्राजक्ताच्या आईने तिला सायन्स घ्यायला सांगितलं डॉक्टर नाहीतर इंजिनिअरिंग घे असं तिच्या आईचं म्हणणं होतं.
तेव्हा प्राजक्ता आईशीच भांडायला लागली. ” मग मला वयाच्या ६ व्या वर्षांपासून नाच का शिकवला? मी एवढे वर्ष शिकून कायच केलं मग आयुष्यात?. माझा वेळ का वाया घालवलास?. मग जर हेच करायचं होतं तर मी पहिल्यापासून तेच केलं असतं, मी नाचत का बसले? .आता नाही, आता ही वेळ गेलीये आणि मी आर्टस् च घेणार. त्यानंतर आईने डोक्याला हातच लावला, तीचं म्हणणं होतं की की काही छंद असतात आवड असते. पण आम्हाला काय माहीत तुला चांगले मार्क्स मिळतील. पण मी काहीही ऐकलं नाही आणि सगळ्यांच्या विरोधात जाऊन एसपी कॉलेजमध्ये जाऊन आर्टस् ला ऍडमिशन घेतलं होतं. हे दहावीला मी हे बंड पुकारलं होतं.”असे प्राजक्ता म्हणते.