marathi tadka

हा आहे पूजा सावंतचा होणारा नवरा…अमराठी नाही तर मराठी मुलाशीच बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री पूजा सावंत ही गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत नायिका तसेच सहनायिका म्हणून काम करत आहे. भूषण प्रधान आणि वैभव तत्ववादी हे तिचे सहकलाकार आहेत या दोघांसोबत तिने अनेक चित्रपट केले आहेत. त्यामुळे या दोघांबरोबर तिची खूप चांगली मैत्री देखील आहे. त्यामुळे अनेकदा तिचे नाव वैभव सोबत तर कधी भूषण सोबत जोडण्यात आले. पण भूषणला गर्लफ्रेंड आहे हे त्याने गेल्या वर्षीच सोशल मीडियावर जाहीर केले होते तेव्हा भूषणचा पत्ता कट करण्यात आला होता. पण तरीही पुजाने वैभव तत्ववादी सोबत लग्न करावे असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण काल एंगेजमेंटचे फोटो शेअर करत पूजा सावंतने सगळ्यांचीच बोलती बंद केली. अखेर पूजा सावंत कोणाशी तरी लग्न करतीये हे जाहीर करण्यात आले.

pooja sawant with siddhesh chavan
pooja sawant with siddhesh chavan

पण ती ज्याच्यासोबत लग्न करतीये तो तरुण कमीतकमी मराठी असावा असे अनेकांचे म्हणणे होते. कारण बऱ्याचदा मराठी अभिनेत्री अमराठी मुलांशीच लग्न करताना दिसल्या आहेत. पूजा सावंतने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव गुपित ठेवले होते. पण आज तिने हे नावही जाहीर केलेले पाहायला मिळत आहे. पूजाने ज्याच्यासोबत साखरपुडा केला त्या हँडसम तरुणाचं नाव आहे सिद्धेश चव्हाण. सिद्धेश चव्हाण हा दिसायलाही स्मार्ट आहे काही वेळापूर्वीच या दोघांनी एकमेकांसोबतचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काल पूजा सावंतने सिद्धेशचा चेहरा लपवला होता पण आज तिने त्याचे नाव देखील जाहीर करत हा मिस्ट्रीमॅन कोण आहे याचा उलगडा केला आहे.

pooja sawant with siddhesh chavan wedding engagement ring
pooja sawant with siddhesh chavan wedding engagement ring

अर्थात त्याच्या नावाचा हा उलगडा झाल्याने पूजाने तिच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून मराठीच मुलाची निवड केली असल्याने अनेकांनी तीचं कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. पूजा आणि सिद्धेश एकमेकांना गेल्या एक ते दीड वर्षांपासून ओळखतात. सिद्धेश बिजनेमन आहे की आणखी काय करतो याचा अजून उलगडा झालेला नाही. मात्र सिद्धेशला फिरण्याची आणि फोटोग्राफीची विशेष आवड असल्याचे लक्षात येते. सिद्धेश आणि पुजाचे हे लव्हमॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे याचा उलगडा लवकरच होईल. तूर्तास या दोघांच्या एंगेजमेंटनंतर सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अजूनही अभिनंदनाचा वर्षाव सुरू ठेवला आहे. दरम्यान आता पूजा सावंत चव्हाण कुटुंबात सून म्हणून कधी जाणार याची जास्त उत्सुकता आहे. तिच्या लग्नाचा हा थाट पाहण्यासाठी सगळेचजण खूप उत्सुक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button