news

मराठी अभिनेता आणि अभिनेत्रीच्या जोडीचा नुकताच झाला साखरपुडा… साखरपुड्याचे फोटो होत आहेत व्हायरल

काल पूजा सावंत हिने बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करून अचानकपणे सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. बोटातली अंगठी दाखवत पूजा सावंत हिने आता आपण सिंगल नसल्याचे जाहीर केले आहे त्यावर मराठी सेलिब्रिटींनी पूजा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे अभिनंदन केले. पूजा सावंत कोणासोबत लग्न करतीये हे अजून तिने जाहीर केलेले नाही मात्र आता तिच्या पाठोपाठ मराठी सृष्टीतील आणखी एका कलाकाराने एंगेज्ड असल्याचे जाहीर केले आहे. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेचा मुलगा शुभंकर एकबोटे हा गेली अनेक वर्षे मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून सक्रिय आहे. शुभंकर एक हरहुन्नरी अभिनेता आहे हे वेळोवेळी त्याने त्याच्या अभिनयातून दाखवले आहे. शुभंकर त्याच्या सहनायिकेलाच डेट करतोय अशी चर्चा रंगली होती. मात्र आता त्यांनी स्वतःच या नात्याची जाहिपणे कबुली दिलेली पाहायला मिळत आहे.

shubhankar ekbote and amruta bane
shubhankar ekbote and amruta bane

कन्यादान या मालिकेत काम करत असताना शुभंकर सहनायिका अमृता बने हिच्या प्रेमात पडला. मालिकेव्यतिरिक्त हे दोघेही अनेकदा एकत्र बाहेर फिरायला जात होते. त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे अशी कुजबुज देखील पाहायला मिळाली. पण आता बोटातली अंगठी दाखवत अमृताने शुभंकरच्या प्रेमाचा स्वीकार केलाय असे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मराठी सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रेम कसं जुळलं याबद्दल शुभंकर म्हणतो की, ” Look test for ‘कन्यादान’.. एक सुंदर मुंबई girl माझ्या पत्नीच्या भूमिकेत काम करणार आहे म्हणून character photos आणि look च्या दृष्टीने ‘तिला नवरा म्हणून मिठीत घे आणि hold करा’ असे दिग्दर्शकाने सांगितले ..त्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं ….जरी ती professional गोष्ट असली तरीही कुठेतरी दोघांच्याही नजरेतून एक चमक पटकन येऊन गेली.. हि चमक अवघडलेपणाची होती का येणाऱ्या काळाचा इशारा देणारी होती हे मात्र त्या क्षणी लक्षात नाही आलं …तरीही photo .. Pose .. Look हे सोपस्कार झाले ! This was our reel hug which was somewhat awkward for me!… आणि अशा तर्हेने आम्हा दोघांची somewhat awkward , happy , fresh & happening reel journey सुरु झाली ! मग ह्या journey मध्ये कामामुळे रोजच्या रोज भेटी , संवाद, वेगवेगळ्या emotion चे scenes आणि त्याबद्दल होणारा संवाद हे सगळं सुरु झालं !

actress amruta bane
actress amruta bane

हि journey एक एक station घेत सुमारे 1 वर्ष 9 महिने अशीच चालू होती! अचानक एका station वर.. थोडी जरी संधी मिळाली तरी, एका दिवसाची सुट्टी मिळाली तरी माझ्या मूळ गावाकडे म्हणजेच माझ्या पुण्याकडे पळणारा मी .. अरे धावपळ का करतोस असा माझ्या बाबा चा ओरडा खाणारा मी 2-3 दिवस सलग सुट्टी मिळूनही मुंबईतच थांबायला लागलो!… हे का झाले ..? तर ‘कुछ बाते बस हो जाती है , और शायद इसे ही प्यार कहते हैं!’ हे माझ्या लक्षात आले!… ‘घाईघाईत पुण्याला येऊ नकोस’असं म्हणणारा माझा बाबा ‘अरे 2 दिवस सुट्टी मिळून सुद्धा का नाही येतेस तू ..?’ असं म्हणायला लागला … कधीच कल्पनेच्या canvas वर नसलेलं चित्र माझं मन कधी नकळतपणे रंगवायला लागलं त्यात रंग भरू लागलं हे माझं मलाच समजलं नाही !…. ओळख तर reel journey मध्ये झालीच होती पण आता हळू हळू खऱ्या मैत्री ला सुरुवात झाली!… त्यात कामा व्यतिरिक्त भेटी,कोणत्याही विषयावर अवांतर चर्चा , रात्री उशिरापर्यंत घरा जवळ कट्टा टाकणे , मुंबईतल्या वेगवेगळ्या special जागांवर फिरणं , खूप variety ची खवय्येगिरी , नाटक , सिनेमा, कविता , गाणी, SRK वर असलेलं unconditional प्रेम , मराठा मंदिर मध्ये जाऊन ddlj चा show एकत्र बघणं , third wave coffee , cadbury crackle , little hearts, marine drive , पुण्याची सफर , colaba causeway , crawford market आणि बरंच काही … हळू हळू मुंबईची local train जशी track हळुवारपणे change करते तसंच reel journey ने सुंदर real journey चा track पकडला!… राज अगर ये तुझे प्यार करती है तो ये पलटके देखेगी… और लड़की ने पलटकर देखा!

shubhankar ekbote and amruta bane wedding engagement
shubhankar ekbote and amruta bane wedding engagement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button