सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. राजकारणाच्या धामधुमीत नुकताच एक बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती असलेल्या विकिपीडियावर पत्नीच्या नावाच्या जागी अभिनेत्री अनन्या सोनी हिचे नाव टाकण्यात आले आहे. त्यामुळे हा स्क्रीन शॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. कोणीतरी अज्ञाताने ह्या माहितीत मुद्दामहून बदल घडवून आणला होता असे पक्षाचा निदर्शनास आले. ही बातमी व्हायरल होताच पक्षाने योग्य ती कारवाई करत काही वेळापूर्वीच विकिपीडियात सुधारणा केली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असून कोणीतरी खोडसाळपणे त्यांच्या जागी अभिनेत्री अनन्या सोनी हिचे नाव टाकले होते. अनन्या सोनी ही एक अभिनेत्री आहे तिने मेरे साई मालिकेसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे अनन्या सोनी हे नाव सध्या चर्चेत आलं आहे. पण ही एक खोटी बातमी असली तरी सध्या महाराष्ट्रातील एका बड्या राजकारण्याचे असेच एक नाव पुढे येत आहे.
हे राजकारणी म्हणजेच उद्योग मंत्री उदय सामंत होय. उदय सामंत यांचेही नाव एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत जोडले जाते. जया सामंत या उदय सामंत यांच्या पत्नी आहेत. तीर्था आणि कीर्ती या दोन मुली त्यांना आहेत. पण प्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के यांच्यासोबत उदय सामंत यांनी दुसरे लग्न केलंय अशी एक चर्चा आहे. मराठी इंडस्ट्रीतून बऱ्याचशा सेलिब्रिटींनाही याबाबत कल्पना आहे. नीलम शिर्के यांनी सोशल मीडियावर त्यांच्या या नावापुढे सामंत यांचे आडनाव लावले आहे. कित्येकदा उदय सामंत यांच्या कामगिरीचे नीलम शिर्के यांनी सोशल मीडियावर कौतुकही केलेले पाहायला मिळते. या दोघांचे एकत्रित फोटो कुठेच पाहायला मिळत नाही. याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांचं हे नातं लपवून ठेवलेलं आहे. पण मल्लिकार्जुन खरगे यांच्या या बातमीने पुन्हा एकदा उदय सामंत यांची आठवण करून दिली आहे.
अभिनेत्री नीलम शिर्के यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी नाटक, चित्रपट, तसेच मालिका सृष्टीतही काम केलं आहे. उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांनी एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला होता. असंभव, वादळ वाट, गडबड गोंधळ, क्षण, पछाडलेला, कोपरखळी, चार चौघी अशा कलाकृतीतून त्यांनी गंभीर भूमिका तर कधी विनोदी भूमिका देखील साकारल्या आहेत. नीलम शिर्के यांनी २०१० मध्ये उदय सामंत यांच्याशी लग्न केलं असं बोललं जातं. पण मुलीच्या जन्मानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातूनच काढता पाय घेतलेला पाहायला मिळाला. पण आजही अनेक कार्यक्रमांना त्या आवर्जून हजेरी लावताना पाहायला मिळतात.