“मी मराठा अजिबात नाही” मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण…मराठा आरक्षणाच्या सर्व्हेसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मात्र हा मोर्चा इच्छित स्थळी पोहोचण्यागोदरच पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकारात्मक आहेत. या मागण्या मान्य करणारा एक जीआर त्यांनी मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान या जिआरमध्ये नेमकं काय आहे हे जरांगे काही वेळातच जाहीर करणार आहेत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यासोबतच मराठा आरक्षणाबाबत काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिच्याही परिसरात हे सर्वेक्षण सुरू आहे.
मात्र केतकीच्या एका उत्तराने तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. नुकतंच केतकी चितळेच्या घरी एक महिला कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी आली होती. त्यावेळी केतकीने तिच्या मोबाइलमध्ये त्या महिला कर्मचाऱ्यासोबत झालेला एक संवाद रेकॉर्ड केला आणि तो केतकीने सोशल मीडियावर टाकला. महिला कर्मचारी तिला नेमून दिलेले काम करत होती. केतकीने तिला मध्येच हटकले आणि तुम्ही सगळ्यांना कास्ट का विचारता असा प्रश्न केला. तेव्हा त्या महिला कर्मचाऱ्याने सकारात्मक प्रतिसाद दिला. तेव्हाच तिने केतकीला ‘तुम्ही मराठा आहात का?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा केतकीने, ‘ अजिबात नाही, मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे’…असे उत्तर दिले. केतकीचे असे रोखठोक उत्तर ऐकताच महिला कर्मचारी तिथून निघून गेली. पण आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही कोणत्या समाजाचे आहेत याचे सर्वेक्षण सुरू आहे असे केतकीने अधोरेखित केले.
मुळात केतकी चितळे हीआरक्षणाच्या विरोधात आहे. याअगोदर देखिल तिने समान नागरी कायदा यावा असे म्हटले होते. आणि आजही तिने हाच मुद्दा इथे उपस्थित केला. ‘सगळ्यांसाठीच सर्वच कायदा समान का नाही?’ असा खोचक प्रश्न तिने हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना विचारला आहे. ‘सगळ्यांना समान नागरी कायदा लागू केला जावा. तुमची जात पाहून तुमच्यावर वेगवेगळे कायदे ,नियम लावले जातात हे तुम्हाला योग्य वाटतं का?. विचार करा, माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या आणि मगच कमेंट करा असे म्हणत केतकीने आरक्षणाच्या विषयाला हात घातला आहे. अर्थात तिचे म्हणणे एवढेच आहे की सरकारने सगळेच आरक्षण रद्द करून सर्वांना समान वागणूक, समान कायदा देण्यात यावा. तिच्या या मतावर साकारात्मक आणि नाकारत्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.